चंद्रपूर :- अतिवृष्टीने जिल्ह्यातील इरई नदीला पुर आला आहे . त्यामुळे चंद्रपूर शहरासह लगतच्या लखमापूरला पुराचा फटका बसला.पुराची तीव्रता अधिक असल्याने येथिल आझादनगर झोपडपट्टीतील अनेक घरांची पडझड होऊन जनजीवन विस्कळीत झाले आहे . या झोपडपट्टी भागात राहणार्या पुरपीडीतांना आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या माध्यमातून अनाज, किराणा किट आणि ताडपत्रीचे वितरण करण्यात येत आहे. आज पुरपीडीतांना या साहित्यांचे वाटप भाजप जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांनी केले .
यावेळी, जिल्हा महामंत्री नामदेव डाहुले, जिल्हा उपाध्यक्ष रामपाल सिंह, भाजयुमोचे प्रदेश सचिव अनिल डोंगरे, माजी जि. प. सदस्य विलास टेंभुर्णे, शांताराम चौके, नामदेव आसुटकर, सुदर्शन निषाद यांचेसह आदी मंडळी उपस्थित होते.