चिमूर :- तालुक्यात मागील आठ ते दहा दिवसांपासून सतत पावसाने थैमान मांडले असून जिल्यात सगळीकडे पाणीच पाणी झाले,शेतकऱ्यांची पिके पाण्याखाली गेली ,पिके सडली,बियाणे सडले, शेतकऱ्यांचे भरमसाठ नुकसान झाले,पावसामुळे,शाळा कॉलेजेस बंद ठेवावे लागले,गावागावात घरांची पडझड झाली, रस्ते वाहून गेली,पुरात जनावरे,माणसं वाहून गेली,आधीच दोन वर्ष कोरोनाने हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना अजून अतिृष्टीचा जोरदार फटका बसलेला आहे,
उधारीवर घेतलेल्या बियानांचे,खताची परत फेड करायची कशी हा गंभीर प्रश्न शेतकऱ्यांपुढे आ वासून उभा आहे, या गंभीर परिस्थितीत सरकारने राज्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना तात्काळ मदत जाहीर करावी.अशी मागणी वडसी ग्राम पंचायत सदस्या रिना पाटील यांनी केली आहे.वडसी परीसरात हत्तीनाला व उमानदीला भयानक पुर आल्यामुळे या परीसरातील शेतकऱ्यांचे पिकं आजही पाण्यात डुंबुन असल्याने धानाचे पिक खराब होत आहे.शतकऱ्याना दुसऱ्यांदा पऱ्य्हे टाकण्याची वेळ आली आहे तरी शासनाने त्वरीत पंचनामे करून शेतकरी वर्गाला काही तरी मदत करावी अशी मागणी रिना पाटील यांनी केली आहे.