घूग्घुस :-घूग्घुस येथील लॉईडस मेटल & एनर्जी लिमिटेड कंपनी मध्ये बुधवार दिनांक 06 जुलै 2022 रोजी सायंकाळी 06:00 वाजता च्या सुमारास दोन कामगार तिथे काम करीत असताना सायलो कोसळला ज्यामध्ये कुठलीही जीवित हानी झाली नाही.अशीच एक घटना दिनांक 18 जून 2022 रोजी घडली ज्यामध्ये कंपनीतील ट्रान्सफॉर्मर जडले त्यावेळेस सुद्धा कोणतीही जीवितहानी झाली नाही परंतु वारंवार अश्याप्रकरच्या घडत असलेल्या घटनांवरून असे दिसून येते की या कंपनी मध्ये कुठल्याही प्रकारच्या सुरक्षा नियमांचे पालन केल्या जात नाही. सोबतच कंपनी मध्ये अग्निशमन वाहन सुद्धा नाही आणि कंपनी कडे रुग्णवाहिका आहे किंवा नाही यावर ही प्रश्न चिन्ह निर्माण होतो. ज्यामुळे तिथे काम करणाऱ्या कामगारांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे मात्र यासर्व गोष्टींकडे जिल्हा औद्योगिक सुरक्षा विभागाचे पूर्णपणे दुर्लक्ष आहे.
याप्रकारच्या वारंवार घडत असलेल्या घटनांचा आम आदमी पार्टी द्वारा जाहीर निषेध व्यक्त करत कंपनी वर कारवाई करण्याची मागणी जिल्हा औद्योगिक सुरक्षा विभागा चंद्रपूर व जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली.येत्या 07 दिवसांमध्ये कुठलीही कारवाई करण्यात आली नाही तर संबंधित सरकारी विभागाच्या अधिकाऱ्यांची तक्रार त्यांच्या वरिष्ठांकडे आम आदमी पार्टी घुग्घुस द्वारा करण्यात येईल सोबतच कंपनी व जिल्हा औद्योगिक सुरक्षा विभाग विरोधात आंदोलन करण्याचा इशारा यावेळी आम आदमी पार्टी शहर अध्यक्ष अमित बोरकर यांनी दिला.
यावेळी आम आदमी पार्टी घुग्घुस महिला शहर अध्यक्ष उमा तोकलवार, शहर अध्यक्ष अमित बोरकर,महिला सचिव विपश्यना धनविजय, महिला संघटन मंत्री पुनम वर्मा, महिला उपाध्यक्ष सोनम शेख, महिला कोषाध्यक्ष अंजली नगराळे, रिना पेरपुल्ला, शामला तराला, धम्मदिणा नायडू, नईमा शेख, कविता विष्णु भक्त, शोभाताई, मीनाक्षी पाझारे, शहर उपाध्यक्ष अभिषेक सपडी, सचिव संदीप पथाडे, सह सचिव विकास खाडे, संघटन मंत्री रवी शांतलावार, सह संघटनमंत्री आशिष पाझारे, युवा अध्यक्ष प्रशांत सेनानी, करण बिऱ्हाडे, प्रफुल पाझारे, निखिल कामतवार, अनुप धनविजय, अनुप नळे, संतोष सलामे, व इतर सदस्य उपस्थित होते..













