भद्रावती:- तालुक्यातील टाकळी या गावांत गोकुळ झिबला दानव यांचे घरी ३० जून रोज गुरुवारला अचानक आग लागली. आगीचे कारण अद्यापही समजले नसून आग इतकी भयंकर होती की दानव यांचे घराचे संपूर्ण साहित्य आगीत भस्म झाले. यात टी व्ही ,फ्रिज व इतर मौल्यवान साहित्य जळून खाक झाले.
भद्रावती तालुक्यातील समाजसेवक व कोरोनायोध्दा डॉ. अंकुश आगलावे, गुरूदेव प्रचारक व केंद्रीय मानवाधिकार संगठनचे विदर्भ प्रदेश अध्यक्ष यांना ही माहिती कळताच घटना स्थळी धाव घेतली व मा. तहसिलदार यांना फोनवरून सुचना देवून पटवारी मार्फत मोका चौकशी करून पंचनामा केला व त्यानंतर महावितरण कंपनीला सुचित करून चौकशी करावयास लावले. डॉ. आगलावे यांनी तात्काळ पाच हजार रूपयाची आर्थिक मदत दानव कुटुंबियांला दिली व शासनाकडून भरीव आर्थिक मदत मिळण्याकरीता पाठपुरावा करणार असल्याचे डॉ. आगलावे यांनी सांगितले.
दानव कुटूबियातील कर्ता पुरूष मोलमजुरी करून आपले उदरनिर्वाह करतात त्यातच कुटुंबीयांची पालनपोषणाची व मुलाचे शिक्षणाची जवाबदारी आहे. मोलमजुर करणाऱ्या दानव कुटुंबियांचे छत्र हरविले असल्याने आर्थिक संकटात सापडलेला आहे.
यावेळी टाकळी गावांतील प्रभाकर मत्ते, निळकंठ दानव, शंकर खांडाळकर, बाबा बलकी, राजु आसेकार, राहुल बलकी, सचिन ढेंगळे, केशव देउळकर, विक्रम पेटकर, मोरेकांत लेडाजे, मारोती खाडे, करन मत्ते व गावातील ज्येष्ठ नागरिक, गुरूदेव प्रचारक, केंद्रीय मानवाधिकार संगठनचे पदाधिकारी उपस्थित होते.