मुंबई :- काल महाराष्ट्राच्या नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली. पण भाजपकडे बहुमत असतानाही भाजपने मुख्यमंत्रीपद एकनाथ शिंदे यांना दिलं त्यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर पसरला आहे. त्याचबरोबर ब्राम्हण महासंघाने भाजपच्या नेतृत्वावर टीका केली आहे. भाजपा मध्ये ब्राह्मणांचे खच्चीकरण ! होत आहे असा आरोपच सोशल मीडिया द्वारे भाजपच्या पक्षश्रेष्टींवर केला आहे.
पंतप्रधान स्पर्धेमधून हटविण्यासाठी नितीन गडकरीच्या चारीत्र हननाच्या माध्यमातून खच्छीकरण केल्या नंतर गेले तिन वर्षा पासुन भाजपातील तथाकथीत नेते मंडळी देवेंद्र फडणविस यांचा घोडादौड अडविण्या करीता पूर्ण बहुमतापेक्षा अधीक संख्या आमदारांना निवडून आल्यानंतर सरकार न बनविण्याचा षडयंत्र आखून योजनाबद्ध पद्धतिने देवेंद्र फडणवीस याना सत्तेपासून लांब ठेवण्यात आले. आत्ता फडणविस यांनी आपल्या राजकीय कौशल्यातून पुन्हा भाजपाला सत्तेचा दारापर्यंत पोहचविले नंतर एकनाथ शिंदे यानां मुख्यमंत्री बनविण्याचे निर्देशन दिले. देवेंद्र फडणविस यांनी मोठ्या मनाने मुख्यमंत्री पदाचा त्याग करून कार्यकर्ता म्हणून काम करण्याचे ठरविल्या नंतर भाजपातील वरीष्ठ नेतृत्वाने बळजबरीने उपमुख्यमंत्री पद स्वीकारण्यासाठी आग्रह धरून देवेंद्र फडणवीस यांचे खच्चीकरण करण्यात आले आहे. भाजपा मध्ये एकानंतर एक ब्राह्मण नेतृत्वाचे खच्चीकरण करण्याचे एक सुनियोजित कारस्थान चाललेले निदर्शनात येत आहे. याघटनेचा अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ तीव्र शब्दात निषेध करीत आहे. अशा आशयाची फेसबुक पोस्ट अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ अध्यक्ष डॉ. गोविन्द कुलकर्णी यांनी ब्राह्मण महासंघ (Brahman Mahasangh) या फेसबुक पेज वरून केली आहे .