मुंबई :- देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री होतील, अशी मोठी घोषणा केली आहे. शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हे सरकार येईल, असं फडणवीस यांनी स्पष्ट केलं. या सरकारमध्ये शिंदे गट आणि भाजपचे मंत्री सहभागी असतील, असं त्यांनी स्पष्ट केलं. हे सरकार पडलं त्यावेळी महाराष्ट्राला एक पर्यायी सरकार देणं आवश्यक होतं. मी त्याचवेळी सांगितलं होतं हे सरकार चालणार नाही. आम्ही निवडणुका लादणार नाही, हे सांगतलं होतं. म्हणून शिवसेनेचा विधीमंडळ गट, भाजपचा गट आणि 16 अपक्ष आणि छोट्या पक्षांचा गट सोबत आले आहेत. या सगळयांचे पत्र राज्यपालांना दिले आहे. भाजपने हा निर्णय केला की, आम्ही सत्तेच्या पाठीमागे नाही. ही तत्वांची लढाई, हिंदुत्वाची, विचारांची लढाई आहे, असं फडणवीस म्हणाले. फडणवीस हे मंत्रिमंडळात नसणार आहेत हे विशेष ते या सरकारला बाहेरून पाठिंबा देणार असल्याची माहिती हि त्यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे . आज सायंकाळी ७ वाजता एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार अशी घोषणा हि यावेळी करण्यात आली