चिमूर :- तालुक्यातील खरकाडा येथे कृषी विभागामार्फत कृषी संजीवनी सप्ताह साजरा करण्यात येत आहे या निमित्ताने दि २७ जूनला खरकाडा येथे शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन महिला सक्षमीकरण व तंत्रज्ञान बळकटीकरण दिना साजरा करण्यात आला यानिमित्त सभा आयोजित करण्यात आली होती .
. कृषी विभागाच्या वतीने २५ जुन ते १ जुलै पर्यंत कृषी संजीवनी चे आयोजन करण्यात आले आहे या निमित्ताने कृषी अधिकारी हे शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांची सभा घेऊन पिकांबद्दल बियानाबदल खताबद्दल लावणी पेरणी बदल तंत्रज्ञानाबद्दल माहिती देत आहेत
खरकाडा येथील सभेत शेतकरी महिला बचत गटातील महिला उपस्थित होत्या. या मध्ये महिलांना शेतात कश्या पद्धतीने काम करायचे तंत्रज्ञान चे उपयोग कशा करायचा आणि भरघोस पीक घेऊन प्रगती कशी साधायची याबद्दल माहिती दिली सभेत मार्गदर्शन करताना . हेमत शेदरे कृषि भुषण शेतकरी सावरगाव यांनी सोयाबिन पिक लागवड पध्दतीत बदल करणे हे काळाची गजर असुन बि.बि.एफ. व सरी वरंभा पध्दतीने लागवड करण्याचे यांगण्यात आले. तसेच महिला शेतकरी शिवाय शेती करणे शक्य नाही .मंडळ कृषि अधिकारी नेरी आर. के. निखार यांनी मार्गदर्शन करताना कृषि विभागातील विविध योजना आधुनिक शेती तंत्रज्ञानाची माहिती शेतकरी महिलानां दिली. कृषि सहाय्यक बि.बि.आडे यांनी मार्गदर्शन करताना शेती तंत्रज्ञानाची माहिती कापुस, सोयाबिन, भातपिक लागवडी संदर्भात मार्गदर्शन केले तसेच बिज प्रकिया, बुरशीनाशके, किटकनाशके, जैविक बिज प्रकिया, निंबोळी अर्क वापर, आझोला युनिट, व इतर कृषि विभागाचा योजनेची माहीती दिली.यावेळी महिला शेतकरी शेतकरी वर्ग उपस्थित होते.