वरोरा : तालुक्यातील पांढरतळा येथील शेतकरी श्रीकांत कळसकर यांच्या कडे रोजंदारीने काम करणाऱ्या मजुराने जनावरे चराई करीता लोनार तलाव परिसरात नेले होते. चराई करत असतांना वाघाने बैलावर हल्ला केला त्यात बैल ठार झाल्याची घटना दोन वाजताच्या सुमारास घडली .
गेल्या काही दिवसांपासून तालुक्यातील विविध भागात वाघाच्या हल्ल्याच्या घटना वाढल्या असून वनविभाग सुस्त असल्याचे दिसत आहे . या घटनांमुळे गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून या वाघाचा बंदोबस्त करावा अन्यथा आम्हाला शिकार करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी गावकरी करतांना दिसत होते.