भद्रावती :- तालुक्यातील वायगाव तुकुम येथील जि प उच्च प्राथमिक शाळेत प्रवेशोत्सव तथा शाळा पूर्व तयारी मेळावा भाग2बालकांच्या उत्साहपूर्वक आगमनाने संपन्न झाला.
सदर कार्यक्रमाचे उदघाटन सरपंच भावना कुरेकार यांचे हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समिती च्या अध्यक्ष नीलिमा कुरेकार, प्रमुख पाहुणे म्हणून उपाध्यक्ष विनोद पोईनकर, सदस्य सारिका भुसारी, भाग्यश्री डाखोरे, पौर्णिमा टेंभुरणे, मुख्याध्यापक गजानन घुमे,अंबुजा फाउंडेशन चे प्रक्षेत्र अधिकारी बालाजी क्षीरसागर आणि पालकवर्ग उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रारंभी गावातून शिक्षणदिंडी काढून नवागतांचे गुलाबपुष्पदेऊन स्वागत करण्यात आले, त्यानंतर नोंदणी, शारीरिक विकास ,बौद्धिक विकास,सामाजिक आणि भावनात्मक विकास,भाषा विकास, गणन पूर्व तयारी, पालकांना मार्गदर्शन असे सात प्रकारचेविविध स्टॉल लावून बालकांच्या कृतींच्या नोंदी विकासपत्रावर घेऊन त्यांना दाखल करण्यात आले. मान्यवरांचे हस्ते पुस्तके व गणवेश वाटप करण्यात आले, मध्यान्ह भोजनात गोड पदार्थ देऊन मुलांचाआनंद द्विगुणित करण्यात आला.
याप्रसंगी शिक्षण विस्तार अधिकारी डॉ. प्रकाश महाकाळकर व केंद्रप्रमुख यशवंत महाले यांनी शाळेला भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधत सर्वांना मार्गदर्शन केले व शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थी उपस्थिती८३%असल्याने समाधान व्यक्त केले.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केशव बोन्डे, सजावट महेश सोरते, मांडणी कविता हनवते आभार प्रदर्शन विलास कुलमेथे यांनी केले, यशस्वितेकरिता विषयशिक्षक विलास बतकी, मीनाक्षी बलकी व स्वयंसेवक आशिष गेडाम, सुरेश बावणे यांनी परिश्रम घेतले.