एखादं मुल रुसलं म्हणा..चूकलं म्हणा मात्र आज उध्दव ठाकरे मोठा भाऊ म्हणून पोटात घेण्याची दानत दाखवत आहेत.
सगळे आज पुढे येऊन बोलत आहेत ते आधी राष्ट्रवादीतच होते हे विसरुन चालणार नाही. आम्ही नात्यात कधी कटुता आणू दिली नाही. जरी पक्ष सोडून गेले तरी आमच्या मनात त्यांच्याविषयी प्रेमाच्याच भावना राहतील, अशी स्पष्ट भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रसार माध्यमाशी बोलतांना मांडली. तर नाती आणि सरकारं ही टिव्हीवर बोलण्यापेक्षा समोरासमोर चर्चा करुन टिकत असतात. त्यामुळे बंडखोर आमदारांनी चर्चा करावी, असा टोलाही त्यांनी बंडखोर आमदारांना लगावला आहे.त्या प्रसारमाध्यमांनी विचारलेल्या प्रश्नांवर बोलत होत्या