वृत्तसंस्था :- भाजपनं निलंबित केलेल्या नेत्या नुपूर शर्मा यांच्या समर्थनार्थ सोशल मीडियात पोस्ट करणाऱ्या टेलरची दोघांनी भरदिवसा दुकानात घुसून निर्घृण हत्या केली आहे. हल्लेखोरांना हत्या करतानाचा व्हिडीओही तयार केला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली असून राजस्थानमधील उदयपूर शहरात तणावाची स्थिती आहे.
कन्हैयालाल तेली असं हत्या झालेल्या तरूणाचे नाव आहे. त्याचे उदयपूर शहरात धनमंडी येथे टेलिंगचे दुकान आहे. याच दुकानात दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास कापड मोजमापाचा बहाणा करून दोघेजण हत्यारं घेऊन घुसले. त्यानंतर हत्या करतानाचा व्हिडीओ चित्रित होईल, अशाप्रकारे तयारी करून त्यांनी तरूणावर हल्ला केला.हल्लेखोरांनी तरूणाचा गळा चिरून हत्या केली आहे. तसेच शरीरावर अनेक वारही केले. या घटनेच्या व्हिडीओमध्ये हल्लेखोरांनी हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे. तसेच ज्या हत्याराने हत्या करण्यात आली तेही व्हिडीओमध्ये दाखवताना दिसत आहेत. सोशल मीडियात हा व्हिडीओ व्हायरल करण्यात आला. त्यानंतर सर्वच एकच खळबळ उडाली आहे.