राजुरा (सागर भटपल्लीवार ):- बल्लारपूर पोलीस ठाण्यात कार्यरत महिला पोलिस मोनल मेश्राम ह्यांच्या दुचाकीला राजुरा येथे मुख्य महामार्गावर मागुन येणाऱ्या आयशर वाहनाने धडक दिल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना सायंकाळी ६ :४० वाजताच्या सुमारास घडली.प्राप्त माहितीनुसार महिला पोलिस मोनल ह्या आपले कर्तव्य बजावून एम एच ३४ ए टी १८७७ क्रमांकाच्या मायस्ट्रो दुचाकीने बल्लारपूर येथुन राजुरा येथे आपल्या राहत्या घरी परत येत असताना मागाहून येणाऱ्या एम एच २९ बी यि ४१५८ क्रमांकाच्या आयशर ट्रक ने धडक दिली. धडक बसताच त्या आपल्या मायस्ट्रो दुचाकीवरील ताबा सुटल्याने त्या खाली कोसळल्या व डोक्याला जबर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात महावितरण विभागात कार्यरत पती विलास बनकर व दोन लहान मुले आहेत.