कोरची :- कोरची पासून पाच किलोमीटर अंतरावर येत असलेल्या झंकारगोंदी फाट्यावरील वडणावर ०२ जून गुरुवारच्या रात्रोला ९ :३० वाजता दरम्यान कार आणि मोटारसायकलचे भीषण अपघात झाला असून यामध्ये मोटारसायकल चालक सुकेल शामलाल नैताम २२ वर्ष रा. टाहकाटोला याचा जागीच मृत्यू झाला . तर प्रवीण सदाशिव कोरचा २५ वर्ष रा.टाहकाटोला हा गंभीर जखमी आहे.
कोरचीवरून कुरखेड्याला जात असलेली MH 33 V 7483 क्रमांकाची आय ट्वेन्टी कार तर विरुद्ध दिशेने येत असलेली CG 08 AT 0110 क्रमांकाची होंडा लिओ मोटरसायकल यांची झंकारगोंदी जवळ वडणार समोरा-समोर जोरदार धडक झाली. धडक एवढी जोरदार होती की मोटारसायकलचा चेंदामेंदा झाला असून मोटरसायकलने पेट घेऊन पूर्णपणे आगीत राख झाली. तर कारमधील चालकसुद्धा जखमी असल्याचे माहिती आहे.
मोटारसायकल चालक मृतक सुकेल नैताम व जखमी प्रवीण कोरचा हे दोघेही गुरुवारी सकाळी आपल्या बहिणीच्या गावी चर्विदंड ला नातेवाईकाकडे लग्नाला गेले होते. रात्रौ परत येतांना सदर अपघात झाला यामध्ये मोटारसायकल चालवीत असतांना मृतकाने हेल्मेट लावले होते . परंतु धडक एवढी जोरदार होती हेल्मेट दूर जाऊन पडले आणि त्याच्या डोक्याला जोरदार मार लागला .
सदर अपघातानंतर या मार्गाने ये जा करणाऱ्यां प्रवासींना मोटारसायकल जडत असून एका कडेला कार उभी असल्याचे दिसले परंतु खूप अंधार असल्याने कुणीही तिथे थांबत नव्हते तेव्हा यामार्गाने येत असलेले डॉ संजय बिश्वास थांबले व यांनी दूर जाऊन रोडखाली झुडपात जखमी प्रवीण चे ओरडणे ऐकले तेव्हा याची माहिती कोरचीतील भाजपा तालुका अध्यक्ष नसरुद्दीन भामानी व नगरसेवक घनश्याम अग्रवाल यांना दिली .तेव्हा लगेच घटनास्थळी दाखल होऊन 108 गाडी ची वाट न बघता पाणी वाहक टेम्पो बोलावली व टेम्पोसोबत आलेले डोमेश्वर मडावी,हिवराज राऊत,तुषार सांडील, डिकेश सांडील यांनी जखमी प्रविण ला गाडीत टाकून कोरची ग्रामीण रुग्णालयात आणले. जखमीच्या उजव्या हाताला दुखापत झाली असून आंतरिक मार लागला असल्याने बेशुद्ध असल्याने रुग्णालयातील डॉ भुणेश्वर खुणे यांनी प्राथमिक उपचार देत रुग्णालयाची 102 गाडीने रात्री 12:30 वाजता सुमारास गडचिरोली रुग्णालयात रेफर केले. रात्रोच्या वेळी माझ्या मुलाला दवाखान्यात आणले असल्याने जखमी प्रवीण कोरचाच्या परिवाराने मदतीला आलेल्याचे देवदूतच बनून आले असल्याचे आभार व्यक्त करत होते. सदर घटनास्थळावरून कार चालक फरार झाले असून याबाबद बेडगाव पोलीस मदत केंद्रात कलम 304 अ,279,337 भा द वि कलम 184,134/177 मो वा का प्रमाणे गुन्हा नोंद केला असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक नितीश पोटे हे करीत आहेत.