• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
  • E-paper
Online News Portal
ADVERTISEMENT
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
Online News Portal
No Result
View All Result
Home देश

भारतीय महिला क्रिकेट वर्ल्डकप विजेत्या संघाचा पडद्या मागचा खरा शिल्पकार मुंबईकर अमोल मुजुमदार.

अखेर वडिलांचे अपूर्ण स्वप्न पूर्ण केले.

admin by admin
November 4, 2025
in देश, स्पोर्ट्स
Reading Time: 1 min read
A A
0
भारतीय महिला क्रिकेट वर्ल्डकप विजेत्या संघाचा पडद्या मागचा खरा शिल्पकार मुंबईकर अमोल मुजुमदार.
Spread the Information

मुंबई : संयम गमावलेल्या माणसांसाठी आदर्श ठरणारी कहाणी म्हणजे अमोल मुजुमदार. 30 शतकं, 60 अर्धशतकं, 11000 पेक्षा जास्त धावा, एकही आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना नाही, तरीही जगाला दखल घ्यायला लावणारा जगज्जेता ज्याला पुढील सचिन तेंडुलकर म्हणून म्हटले जायचे. ५२ वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर, भारतीय महिला संघ प्रथमच विश्वविजेता बनला. नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवर दिवाळीसारखे वातावरण होते. शेकडो कॅमेरे खेळाडूंवर केंद्रित होते. तेवढ्यात भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौर धावत आली आणि प्रशिक्षक अमोल मजुमदार यांचे पाय स्पर्श करून त्यांना मिठी मारली आणि ढसाढसा रडू लागली. हे दृश्य ज्याने पाहिले त्याला खरोखरच’चक दे इंडिया’ चित्रपटातील प्रशिक्षक कबीर खानची आठवण झाली असेल.

RelatedPosts

भारताच्या रणरागिणीचां वुमेन्स वनडे वर्ल्डकप स्पर्धेत ऐतिहासिक विजय ऑस्ट्रेलियाला हरवून फायनलमध्ये प्रवेश.

उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत एनडीएचे सीपी राधाकृष्णन विरूद्ध इंडिया आघाडीचे बी सुदर्शन रेड्डी असा थेट सामना.

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा भारता संदर्भात सर्वात मोठा आणि धक्कादायक निर्णय जाहीर.

भारतीय महिला संघाचे प्रशिक्षक अमोल मजुमदार यांनी प्रशिक्षण सुरू करण्यापूर्वी २० वर्षे स्थानिक पातळीवर क्रिकेट खेळले आहे. १९७४ मध्ये जन्मलेल्या अमोल मुजुमदार यांच्या क्रिकेट कारकिर्दीची सुरुवात लहान वयातच शिवाजी पार्क येथून झाली. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये सातत्याने चांगली कामगिरी करूनही, अमोल मजुमदार कधीही भारताकडून खेळले नाही. खरं तर, जेव्हा ते रणजी ट्रॉफीमध्ये सातत्याने धावा काढत होते, तेव्हा भारताचा राष्ट्रीय संघाचा कर्णधार सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, व्हीव्हीएस लक्ष्मण आणि सौरव गांगुली सारख्या स्टार खेळाडूंनी भरलेला होता. मजुमदार यांनी या सर्वांसोबत देशांतर्गत क्रिकेट खेळले, परंतु संघात स्थान मिळवू शकले नाही कारण रणजी ट्रॉफीमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना दुलीप ट्रॉफी मिळते, नंतर इराणी कप आणि प्रेसिडेंट-११ संघांमध्ये. खेळण्याची संधी मिळते.

अमोल मुजुमदार यांच्यापूर्वी भारतीय महिला क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक रमेश पोवार होते परंतु कर्णधार मिताली यांच्याशी वाद झाल्यानंतर बीसीसीआयला हस्तक्षेप करावा लागला. मुख्य प्रशिक्षकविना खेळणाऱ्या महिला क्रिकेट संघाची जबाबदारी अचानक मुंबईकडून खेळलेल्या अमोल मुझुमदारकडे सोपवण्यात आली. प्रथम श्रेणी गाजवणारा पण आंतरराष्ट्रीय सामन्यांचा अनुभव नसलेल्या खेळाडूची महिला क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी निवड झाल्यानंतर सर्वांच्याच भुवया उंचावल्या होत्या. पण अमोल मुजुमदार यांनी कठोर मेहनत, सराव, धाडसी निर्णय, नवोदित खेळाडू, खेळाडू बरोबर मैत्री पूर्ण संबंध, खेळाडूंच्या मताला प्राधान्य देणं, मैदानी डावपेच अशा अनेक कल्पक बुद्धीतून भारतीय महिला क्रिकेट संघ घडविला आणि हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली भारताला पहिला एकदिवसीय महिला वर्ल्डकप विश्वचषक जिंकून दिला.

अमोल मुजुमदार यांच्या वडिलांचे स्वप्न होते मुलाने भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करून वर्ल्डकप जिंकावा परंतू ते शक्य झाले नाही अखेर वडिलांचे ते स्वप्न प्रशिक्षक बनून पूर्ण केले.

Previous Post

भारताच्या रणरागिणीचां वुमेन्स वनडे वर्ल्डकप स्पर्धेत ऐतिहासिक विजय ऑस्ट्रेलियाला हरवून फायनलमध्ये प्रवेश.

Next Post

शिवसेनेतून वरोरा नगराध्यक्षपदासाठी सोनम नाशिककर यांचे नाव चर्चेत

admin

admin

Next Post
शिवसेनेतून वरोरा नगराध्यक्षपदासाठी सोनम नाशिककर यांचे नाव चर्चेत

शिवसेनेतून वरोरा नगराध्यक्षपदासाठी सोनम नाशिककर यांचे नाव चर्चेत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 87.1k Followers
  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

February 2, 2025
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

March 5, 2023
वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

January 5, 2024
सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

October 6, 2022
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

1
रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

1
‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

1
 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

1
२३ ते २८ सप्टेंबरदरम्यान जिल्हाभर पर्यटन महोत्सव; ट्रेकिंग, नेचर वॉक, नाईट कॅम्पिंगसह विविध उपक्रम

२३ ते २८ सप्टेंबरदरम्यान जिल्हाभर पर्यटन महोत्सव; ट्रेकिंग, नेचर वॉक, नाईट कॅम्पिंगसह विविध उपक्रम

September 15, 2026
लसीकरणानंतर बाळाच्या मृत्यूची सखोल चौकशी करा शिवसेना ठाकरे गटाची मागणी; कुटुंबीयांची घेतली भेट

लसीकरणानंतर बाळाच्या मृत्यूची सखोल चौकशी करा शिवसेना ठाकरे गटाची मागणी; कुटुंबीयांची घेतली भेट

September 15, 2026
माजी माओवादी ‘भूपती’च्या नियुक्तीला ग्रामसभेचा विरोध; आदिवासी हक्कांच्या संवेदनशील कामाची जबाबदारी देण्यावर आक्षेप!

माजी माओवादी ‘भूपती’च्या नियुक्तीला ग्रामसभेचा विरोध; आदिवासी हक्कांच्या संवेदनशील कामाची जबाबदारी देण्यावर आक्षेप!

September 7, 2026
होंडा सिटीच्या डिक्कीत देशी दारूचा साठा; ७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

होंडा सिटीच्या डिक्कीत देशी दारूचा साठा; ७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

September 7, 2026

Recent News

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
WhatsApp-Add-1