चंद्रपूर :- आशिष घुमे
गोंडपिपरी तालुक्यातील लिखितवाड्यात शॉर्ट सर्किट मुळे आग लागल्याची घटना आज दि.२ सोमवारी दुपारी २ च्या सुमारास घडली.
चेकलिखितवाडा येथील बाबुराव ठाकूर,सुभाष बाबुराव ठाकूर, अमित बाबुराव ठाकूर यांचे पूर्ण घर आगीत जळून खाक झाले.या आगीत अंदाजे १० क्विंटल धान,जीवनावश्यक वस्तू सह रोख रक्कम,तुरी ,अनाज सह सर्व घरातील साहित्य जळून खाक झाले.या आगीत अंदाजी ५ लाखाची नुकसान झाली होत्याच न्हवते झाले कुटुंबियासमोर जगावे कसे असा प्रश्न निर्माण झाला.यावेळी तात्काळ दखल घेत घटनेचे गांभीर्य लक्षात घेता माजी मंत्री आमदार सुधीर मूनगंटीवार यांनी तात्काळ घटनेची दखल घेत भाजपा पदाधिकाऱ्यांमार्फत ठाकूर कुटुंबाला आधार देत आर्थिक मदत केली यावेळी पाठवलेली मदत कुटुंबांला देत सांत्वन करताना भाजपा महिला आघाडी जिल्हा अध्यक्ष कु, अल्का आत्राम , बबन निकोडे ता अध्यक्ष गोंडपीपरी , गणपत चौधरी जेष्ठ नेते ,विनोद देशमुख माजी उपाध्यक्ष पंचायत समिती पोंभुर्णा, भूमिका पिपरे सदस्य पंचायत समिती गोंडपीपरी ,कोमल फरकडे सदस्य चेक लिखितवाडा,संदीप पौरकर सदस्य ग्राम पंचायत वढोली , प्रवीण पिपरे, सुनिल फरकडे ,देवराव राऊत, डॉ धदरे व अनेक गावकरी होते