• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
  • E-paper
Online News Portal
ADVERTISEMENT
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
Online News Portal
No Result
View All Result
Home चंद्रपूर

वृत्‍तपत्र विक्रेता वृत्तपत्र क्षेत्रात रक्‍तवाहीनीचे काम करतो – आ. सुधीर मुनगंटीवार

चंद्रपूरात महाराष्‍ट्र राज्‍य वृत्‍तपत्र विक्रेता संघटनेचे राज्‍यव्‍यापी अधिवेशन संपन्‍न

Ashish Ghume by Ashish Ghume
May 2, 2022
in चंद्रपूर
Reading Time: 1 min read
A A
0
वृत्‍तपत्र विक्रेता वृत्तपत्र क्षेत्रात रक्‍तवाहीनीचे काम करतो – आ. सुधीर मुनगंटीवार
Spread the Information

चंद्रपूर :- सोन्‍यासारखे मुलद्रव्‍य प्राप्‍त व्‍हायला त्‍यालाही तप्‍त अग्‍नीतुन जावे लागते तसेच तुम्‍ही जगातील सर्वात उष्‍ण शहरात आला आहात. इथून जाताना तुम्‍ही सुध्‍दा घडून जाल असा मला विश्‍वास आहे, असे विधीमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार पेपर विक्रेते संघाच्‍या महाराष्‍ट्र राज्‍यव्‍यापी अधिवेशनात बोलत होते.दिनांक २ मे २०२२ रोजी सोमवारला वृत्‍तपत्र विक्रेते संघाचे राज्‍यव्‍यापी अधिवेशन राजीव गांधी कामगार भवन चंद्रपूर येथे आयोजित करण्यात आले.यावेळी आ. सुधीर मुनगंटीवार बोलत होते. यावेळी मंचावर कार्यक्रमाच्या उदघाटक तेलंगणा न्‍युज पेपरचे सेल्‍स कमिटीचे वनमाला सत्‍यम, महाराष्‍ट्र टाईम्‍सचे संपादक श्रीपाद अपराजीत, भाजपा महानगर अध्‍यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे, उपाध्‍यक्ष रामपाल सिंह, जिल्‍हा बार असोसिएशनचे माजी सचिव अॅड. सुरेश तालेवार, महाराष्‍ट्र राज्‍य वृत्‍तपत्र विक्रेता संघटनेचे कार्याध्‍यक्ष सुनिल पाटणकर, सरचिटणीस बालाजी पवार, कोषाध्‍यक्ष गोरख भिल्‍लारे, सल्‍लागार शिवगोंडा खोत, विनोद पन्‍नासे, प्रशांत विघ्‍नेश्‍वर, संजय वद्दलवार, राजेश सोलापन यांची प्रामुख्‍याने उपस्थिती होती.यावेळी आ. सुधीर मुनगंटीवार म्‍हणाले, शरीरामध्‍ये रक्‍तवाहीनी ज्‍या पध्‍दतीने कार्य करते तेच काम आयुष्‍यामध्‍ये वृत्‍तपत्र विक्रेता संघटना करीत आहे. जगामध्‍ये सर्वाधिक वाघ असलेला जिल्‍हा म्‍हणून चंद्रपूर आहे. वाघ आपले लक्ष्य पराक्रमाने पूर्ण करतो. तसेच पत्रकार व पत्रकार विक्रेता संघ सुध्‍दा आपले लक्ष्य पराक्रमाने पूर्ण करतो. जसे सुर्योदयाला कधिही उशिर होत नाही तसेच वृत्‍तपत्र घरी यायला वृत्‍तपत्र विक्रेता कधिही उशिर करीत नाही. मी अर्थमंत्री असताना आमच्या कार्यकाळात पत्रकारांच्या हिताचे अनेक निर्णय घेण्यात आले. वृत्‍तपत्र विक्रेत्‍यांचे हिताचे संरक्षण यासाठी आमचे सरकार असताना ७ मार्च २०१९ रोजी आम्ही समिती गठीत केली होती, त्या समितीचा अहवाल आता शासनाला सादर करण्यात आला आहे. या अहवालातील शिफारशीची अंमलबजावणी व्हावी या साठी विधानसभेत संसदीय आयुधांचा वापर करून निर्णय घेण्यास सरकारला भाग पाडू असेही आ. मुनगंटीवार म्हणाले.

RelatedPosts

वाईट गोष्टींना नाही म्हणायला शिका; स्वतःचे संरक्षण करण्याची सवय लावा — ओमप्रकाश सोनटक्के

स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला चिमुकल्यांना शैक्षणिक किटचे वाटप

वी दा सावरकरांच्या जीवनपैलूंवर शरद पोंक्षे यांचे व्याख्यान

१९३० ते १९४८ या काळात महात्‍मा गांधी सेवाग्राम मध्‍ये होते. इथूनच त्‍यांनी देशाच्‍या स्‍वातंत्र्य चळवळीचे नेतृत्‍व केले. त्‍यांचे विचार वृत्‍तपत्रांनीच जगभर पोहचविले. १९४२ मध्‍ये चले जाव चळवळ सुरू झाली त्‍यावेळी चंद्रपूर जिल्‍हयातील चिमूरमध्‍ये सर्वात प्रथम तिरंगा फडकविण्‍यात आला. भारत-चिन युध्‍दामध्‍ये चंद्रपूर जिल्‍हयाने भारत देशाच्‍या मदतीसाठी सर्वाधिक सुवर्णदान केले आहे. अशा या पावन भूमीध्‍ये आयोजकांचे मी अभिनंदन करतो व सत्‍कारमुर्तीना शुभेच्‍छा देतो. सत्‍ता असो अथवा नसो मी कायमच तुमच्‍यासाठी संसदीय आयुधांचा वापर करून तुमचे प्रश्‍न सोडविण्‍यासाठी प्रयत्‍न करेन असेही आ. मुनगंटीवार म्‍हणाले. या कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक विनोद पन्‍नासे यांनी केले. यावेळी महाराष्‍ट्रातील विविध जिल्‍हयातून आलेले संघटनांचे पदाधिकारी, एजंट, पत्रकार बंधू आदींची उपस्थिती होती.

Previous Post

लिखितवाड्यातील नुकसान ग्रस्त ठाकूर कुटुंबाला आमदार सुभाष धोटेंकडून १५ हजाराची तात्काळ मदत

Next Post

गर्भपाताची औषधे ऑनलाईन विक्री करणाऱ्या ॲमेझॉन विक्रेत्यावर अन्न व औषध प्रशासनाची कारवाई

Ashish Ghume

Ashish Ghume

Next Post
गर्भपाताची औषधे ऑनलाईन विक्री करणाऱ्या ॲमेझॉन विक्रेत्यावर अन्न व औषध प्रशासनाची कारवाई

गर्भपाताची औषधे ऑनलाईन विक्री करणाऱ्या ॲमेझॉन विक्रेत्यावर अन्न व औषध प्रशासनाची कारवाई

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 87.1k Followers
  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

February 2, 2025
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

March 5, 2023
वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

January 5, 2024
सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

October 6, 2022
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

1
रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

1
‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

1
 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

1
२३ ते २८ सप्टेंबरदरम्यान जिल्हाभर पर्यटन महोत्सव; ट्रेकिंग, नेचर वॉक, नाईट कॅम्पिंगसह विविध उपक्रम

२३ ते २८ सप्टेंबरदरम्यान जिल्हाभर पर्यटन महोत्सव; ट्रेकिंग, नेचर वॉक, नाईट कॅम्पिंगसह विविध उपक्रम

September 15, 2026
लसीकरणानंतर बाळाच्या मृत्यूची सखोल चौकशी करा शिवसेना ठाकरे गटाची मागणी; कुटुंबीयांची घेतली भेट

लसीकरणानंतर बाळाच्या मृत्यूची सखोल चौकशी करा शिवसेना ठाकरे गटाची मागणी; कुटुंबीयांची घेतली भेट

September 15, 2026
माजी माओवादी ‘भूपती’च्या नियुक्तीला ग्रामसभेचा विरोध; आदिवासी हक्कांच्या संवेदनशील कामाची जबाबदारी देण्यावर आक्षेप!

माजी माओवादी ‘भूपती’च्या नियुक्तीला ग्रामसभेचा विरोध; आदिवासी हक्कांच्या संवेदनशील कामाची जबाबदारी देण्यावर आक्षेप!

September 7, 2026
होंडा सिटीच्या डिक्कीत देशी दारूचा साठा; ७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

होंडा सिटीच्या डिक्कीत देशी दारूचा साठा; ७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

September 7, 2026

Recent News

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
WhatsApp-Add-1