अवैध शस्त्र बाळगल्याप्रकरणी गोंडपिपरीत कारवाई
गोंडपिपरी(सुरज माडुरवार)
गुप्त माहितीच्या आधारावर गोंडपिपरीत अवैध शस्त्र बाळगल्याप्रकरणी दि.२९ शनिवारी सुनील देवगडेवर कारवाई करण्यात आली.
स्थानिक गोंडपिपरी येथील पंचशील वार्ड येथील रहिवासी असणाऱ्या सुनील केशव देवगडे वय ५५ हा हातात तलवार घेऊन दहशत निर्माण करून शांतता सुव्यवस्था भंग करत असल्याची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक अरविंद साळवे,अप्पर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी ,उपविभागीय पोलीस अधिकारी मल्लिकार्जुन इंगळे यांच्या मार्गदर्शनात ७० सेमी लांबीची धारधार लोखंडी अवैध तलवार जप्त करून भारतीय हत्यार अधिनियम ४,५,२५ आणि २७ प्रमाणे कारवाई करून आरोपीला अटक करण्यात आली.
सदर कारवाई ठाणेदार जीवन राजगुरू, पोलीस कर्मचारी पुरुषोत्तम उईके,विलास कोवे,रतन चव्हाण,अनिल चव्हाण यांनी केली