भद्रावती :
भद्रावती तालुक्यातील आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था मर्या. मोहर्ली र.न. ७०१ च्या संचालक मंडलाची सन २०२१-२२ ते २०२६-२७ या कालावधीसाठीची गट निहाय निवडणुक काल (दि.१९) ला पार पडली.
चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष तथा विद्यमान संचालक रवि शिंदे यांनी त्यांच्या सहकार क्षेत्रातील अनुभवातून गावातील सामाजिक सौहार्द व सलोखा कायम ठेवण्यासाठी कार्यकारी सहकारी संस्थेची निवडणूक अविरोध पार पाडण्यास महत्त्वाची भूमिका बजावली.
आदिवासी सर्वसाधारण कर्जदार गटातून शामराव आत्माराम नन्नावरे, अशोक गणपत घोडमारे, अंबादास पत्रू मेश्राम, बबन राजेश्वर नन्नावरे, जयवंत माधव गोंगुलवार, प्रशांत महादेव गजभे, कृष्णराव आत्माराम नन्नावरे, आदिवासी सर्वसाधारण बिगर कर्जदार गटातून सुरेश बापूराव मोंढे, अनुसूचित जाती जमाती गटातून निमदेव मारोती दुर्योधन, विमुक्त जाती भटक्या जमाती गटातून बुद्धिवान संबा नवघरे, महिला राखीव गटातून मीराबाई गजानन चौखे, कमलाबाई श्रीरामे हे उमेदवार विजयी झाले आहेत.