नागपूर :- संपूर्ण देशात आम आदमी पार्टीबद्दल लोकांचा विश्वास निर्माण होत आहे. आता होऊ घातलेल्या पंजाब, गोवा, उत्तराखंड, उत्तर प्रदेश मध्ये आम आदमी पार्टी पूर्ण तयारीनिशी निवडणूक जोमात लढवीत आहे. येत्या निवडणुकीमध्ये चारी राज्यामध्ये पार्टीला मोठे यश मिळेल अशी पूर्णपणे आशा आहे. संपूर्ण देशात जनतेला दिल्ली मॉडेल्स हवे आहे, एकूणच संपूर्ण देशात दिल्ली मॉडल लागू होण्याचे पूर्णपणे चिन्ह दिसत आहेत. तसेच नागपुरात देखील आम आदमी पार्टी पूर्ण तयारीनिशी मनपा निवडणूक लढवीनार आहे. शहरातील लोकांना आम आदमी पार्टीतर्फे पूर्णपणे आशा पल्लवित झालेले आहे. त्यामुळे नागपूर शहरांमध्ये अनेक प्रतिष्ठित नागरिक पार्टी प्रवेश करीत आहेत.
आज शेतकरी संघटनेचे वरिष्ठ कार्यकर्ते प्रभाकरराव काळे आपल्या प्रमुख सहकाऱ्यांचा आम आदमी पार्टी मध्ये प्रवेश केलेला आहे. प्रभाकरराव काळे गेल्या अनेक वर्षापासून शेतकरी संघटना तसेच इतर चळवळीमध्ये पूर्णपणे सक्रिय आहेत. आज देवेंद्र वानखडे संयोजक विदर्भ यांच्या मुख्य उपस्थितीत मध्ये या सगळ्यांचा प्रवेश कार्यक्रम पत्रकार भवन येथे घेण्यात आला. प्रामुख्याने रामरावजी अवसरे, दिनेश लोंदसे, भास्कर धवड, विश्वनाथ पडोळे, अविनाश रेवतकर, अशोकराव भेदे, राकेश बनाइत, वामनराव झाडे व इतर लोकांनी प्रवेश घेतला. यावेळेस दक्षिण-पश्चिम संयोजक अजय धर्मे, संघटक सुरेश खर्चे, सचिव विनोद अलमदोहकर, आकाश राठोड, समीर पोतदार व इतर कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.
यानंतर लवकरच प्रभाकरराव काले त्यांच्या 300 कार्यकर्तासहित कॉटन मार्केट येथे मोठा पक्ष प्रवेश कार्यक्रम घेनार आहेत.