• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
  • E-paper
Online News Portal
ADVERTISEMENT
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
Online News Portal
No Result
View All Result
Home Gadchiroli

रस्त्याची दुरवस्था विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर भारी; बस पुढे नेण्यास चालकाचा नकार

Mahesh Gundetiwar by Mahesh Gundetiwar
August 3, 2026
in Gadchiroli
Reading Time: 1 min read
A A
0
रस्त्याची दुरवस्था विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर भारी; बस पुढे नेण्यास चालकाचा नकार
Spread the Information

मुलचेरा : तालुक्यातील कोपरअली–विश्वनाथनगर मार्गावरील रस्त्याची झालेली दयनीय अवस्था आता विद्यार्थ्यांच्या शिक्षणावरच परिणाम करू लागली आहे. सोमवारी (दि. 3 ऑगस्ट) पहाटे महाविद्यालयासाठी निघालेल्या सुमारे 40 ते 50 विद्यार्थ्यांना रस्त्यातच अडकून पडावे लागले. रस्त्यावर मोठ्या प्रमाणात चिखल साचल्याने मानव विकास मिशनची बस पुढे नेणे धोकादायक असल्याचे सांगत चालकाने बस थांबविली. परिणामी विद्यार्थ्यांना रस्त्यावरच प्रतीक्षा करावी लागली आणि अनेकांचे महाविद्यालय गाठणेही अशक्य झाले.

RelatedPosts

केंद्रप्रमुखांनीच फिरविली केंद्र शाळेला पाठ;मग शिक्षकांकडून नियमिततेची अपेक्षा कशी?

राष्ट्रीय महामार्गाला तरुणांनी वाहिली श्रद्धांजली; रखडलेल्या कामाविरोधात अनोखे आंदोलन

राष्ट्रीय महामार्गालगत हरिणाचे पाडस मृतावस्थेत; वनविभागाच्या पथकाची प्रतीक्षा

मिळालेल्या माहितीनुसार, एमएच-14 एलएक्स-6569 क्रमांकाची मानव विकास मिशनची बस पहाटे 5.45 वाजता अहेरी येथून लगाममार्गे विद्यार्थ्यांना घेऊन मुलचेराकडे रवाना झाली होती. मात्र विश्वनाथनगरनंतर कोपरअलीजवळील आठवडी बाजार परिसरात रस्त्यावर मोठ्या प्रमाणात चिखल साचलेला असल्याचे दिसून आले. वाहन चिखलात अडकण्याची शक्यता लक्षात घेऊन चालकाने बस पुढे नेण्यास नकार दिला. त्यामुळे बसमधील विद्यार्थ्यांना रस्त्यावरच उतरावे लागले.
या मार्गावर मागील दोन दिवसांपासून चिखलामुळे वाहतूक विस्कळीत झाली आहे. खाजगी वाहनांसह एसटी आणि इतर मोठ्या वाहनांनाही या मार्गावरून प्रवास करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. वाहनांची चाके चिखलात रुतत असल्याने वाहने बाहेर काढण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. रविवारी (दि. 2 ऑगस्ट) याच ठिकाणी एक जड वाहन अडकल्याने रस्त्याची अवस्था आणखी बिकट झाली होती.

लगाम परिसरातील शेकडो विद्यार्थी दररोज याच मानव विकास बसच्या माध्यमातून मुलचेरा येथे शाळा व महाविद्यालयात शिक्षणासाठी ये-जा करतात. मात्र रस्त्याच्या दुरवस्थेमुळे त्यांना वेळेवर शाळेत आणि महाविद्यालयात पोहोचता येत नसून त्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत आहे. या प्रकारामुळे विद्यार्थी, पालक आणि नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

पालक आणि शिक्षकांच्या माहितीनुसार, काही महिन्यांपूर्वी या मार्गावर खडीकरण आणि स्लॅब ड्रेनचे काम करण्यात आले होते. मात्र पावसाळ्यात कोपरअली ते विश्वनाथनगरदरम्यान आठवडी बाजार परिसरात मोठ्या प्रमाणात चिखल साचल्याने रस्ता वाहतुकीसाठी धोकादायक बनला आहे. या मार्गावर दररोज शालेय विद्यार्थी, महाविद्यालयीन विद्यार्थी आणि नागरिकांची मोठी वर्दळ असते.रस्त्याची सद्यस्थिती लक्षात घेता शासन आणि प्रशासनाने तातडीने दुरुस्तीची कामे हाती घेऊन विद्यार्थ्यांसह नागरिकांना दिलासा द्यावा, अशी जोरदार मागणी परिसरातून होत आहे.

Previous Post

भामरागड तालुक्यातील एकमेव पेट्रोल पंपात शिरले पूराचे पाणी

Next Post

फुले चौकाच्या सौंदर्यीकरणाच्या दिरंगाईविरोधात उदयाला भाजपचा नगर परिषदेला घेराव; ठिय्या आंदोलनाची हाक

Mahesh Gundetiwar

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 87.1k Followers
  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

February 2, 2025
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

March 5, 2023
वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

January 5, 2024
सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

October 6, 2022
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

1
रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

1
‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

1
 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

1
केंद्रप्रमुखांनीच फिरविली केंद्र शाळेला पाठ;मग शिक्षकांकडून नियमिततेची अपेक्षा कशी?

केंद्रप्रमुखांनीच फिरविली केंद्र शाळेला पाठ;मग शिक्षकांकडून नियमिततेची अपेक्षा कशी?

August 6, 2026
राष्ट्रीय महामार्गाला तरुणांनी वाहिली श्रद्धांजली; रखडलेल्या कामाविरोधात अनोखे आंदोलन

राष्ट्रीय महामार्गाला तरुणांनी वाहिली श्रद्धांजली; रखडलेल्या कामाविरोधात अनोखे आंदोलन

August 6, 2026
राष्ट्रीय महामार्गालगत हरिणाचे पाडस मृतावस्थेत; वनविभागाच्या पथकाची प्रतीक्षा

राष्ट्रीय महामार्गालगत हरिणाचे पाडस मृतावस्थेत; वनविभागाच्या पथकाची प्रतीक्षा

August 6, 2026
दक्षिण गडचिरोलीत अतिवृष्टीचा तडाखा! शेकडो गावांचा संपर्क तुटला; आलापल्ली–सिरोंचा राष्ट्रीय महामार्ग ठप्प

दक्षिण गडचिरोलीत अतिवृष्टीचा तडाखा! शेकडो गावांचा संपर्क तुटला; आलापल्ली–सिरोंचा राष्ट्रीय महामार्ग ठप्प

August 4, 2026

Recent News

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
WhatsApp-Add-1