कोरची
राज्यभरासह जिल्ह्यातील महसूल कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांना घेवून चार एप्रिल पासून आंदोलन सुरू केले आहे. त्यामध्ये कोरची तहसील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे आज संपाच्या दहावा दिवस असून सुद्धा मागण्यांची पूर्तता न झाल्याने कर्मचारी संप सुरू ठेवलेले आहेत. त्यामुळे विविध प्रमाणपत्रांसाठी नागरिकांना व विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.
महसूल विभागातील अव्वल कारकून, मंडळ अधिकारी स्वर्गातून नायब तहसीलदार संवर्गातील पदोन्नती करण्यात यावी तसेच महसूल सहाय्यकांची रिक्त पदे भरण्यात यावीत, नायब तहसीलदार संवर्ग राज्यस्तरीय संवर्ग केल्या बाबतचे शासन निर्णय रद्द करण्यात यावा आदी मागण्यांना घेऊन महसूल कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. दहाव्या दिवशीही संप सुरू असल्याने विविध दाखल्यांसाठी विद्यार्थी व नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.
यावेळी कोरची तहसील कार्यालयातील एस बी देहारकार अका, एम बारसिंगे अका, एम पी पटले अका, विजय भलावी म.स.,दिलीप भैसारे म.स.,प्रांजली मेश्राम म.स.,बबिता कोरामी म.स.शिपाई संवर्ग कर्मचाऱ्यांचा संपामध्ये समावेश आहे.