• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
  • E-paper
Online News Portal
ADVERTISEMENT
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
Online News Portal
No Result
View All Result
Home चंद्रपूर

शासनाच्या दुर्लक्षाचा फटका; बाबूपेठकरांचे संसार पाण्यात, घराघरांत शिरले पावसाचे पाणी

वारंवार तक्रारी करूनही दखल नाही; रस्ते, नाल्यांची अपूर्ण कामे आणि अतिक्रमणामुळे समस्या अधिकच गंभीर

Ashish Ghume by Ashish Ghume
July 4, 2026
in चंद्रपूर
Reading Time: 1 min read
A A
0
शासनाच्या दुर्लक्षाचा फटका; बाबूपेठकरांचे संसार पाण्यात, घराघरांत शिरले पावसाचे पाणी
Spread the Information

चंद्रपूर : मुसळधार पावसामुळे बाबूपेठ येथील वार्ड क्रमांक 17 मधील हनुमान मंदिर परिसर जलमय झाला असून अनेक घरांमध्ये पावसाचे पाणी शिरल्याने नागरिकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. दरवर्षी उद्भवणाऱ्या या समस्येकडे प्रशासनाकडून सातत्याने दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत स्थानिक नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

RelatedPosts

वाईट गोष्टींना नाही म्हणायला शिका; स्वतःचे संरक्षण करण्याची सवय लावा — ओमप्रकाश सोनटक्के

स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला चिमुकल्यांना शैक्षणिक किटचे वाटप

वी दा सावरकरांच्या जीवनपैलूंवर शरद पोंक्षे यांचे व्याख्यान

स्थानिकांच्या माहितीनुसार, हनुमान मंदिर परिसरात जंगलाच्या दिशेने येणारे पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात साचते. मात्र, या पाण्याचा निचरा होण्यासाठी आवश्यक असलेली नाले व्यवस्था आजही अपुरी आहे. परिणामी, पावसाचे पाणी थेट घरांमध्ये शिरून नागरिकांचे संसारोपयोगी साहित्य, धान्य आणि घरगुती वस्तूंचे नुकसान होत आहे. प्रत्येक पावसाळ्यात हीच परिस्थिती निर्माण होत असतानाही कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात आलेली नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे.

स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, वार्ड क्रमांक 17 मध्ये रस्ते आणि नाल्यांची विकासकामे अद्याप पूर्ण झालेली नाहीत. अपूर्ण कामांमुळे पाण्याचा निचरा होत नसून संपूर्ण परिसर जलमय होत आहे. नागरिकांना घराबाहेर पडणेही कठीण झाले असून लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

काही दिवसांपूर्वी स्थानिक नगरसेवकांनी समस्येवर तात्पुरता उपाय म्हणून परिसरात भराव टाकण्याचे काम सुरू केले होते. मात्र, ट्रॅक्टरच्या ये-जा संदर्भात काही नागरिकांनी आक्षेप घेतल्याने ते काम अर्धवट राहिल्याची माहिती स्थानिकांनी दिली. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी अपेक्षित उपाययोजना पूर्ण होऊ शकल्या नाहीत.

याशिवाय, परिसरातील सुमारे 10 ते 15 फूट रुंदीच्या रस्त्यावर काही ठिकाणी अतिक्रमण करून बांधकाम करण्यात आल्याचा आरोपही नागरिकांनी केला आहे. या अतिक्रमणामुळे पाण्याचा नैसर्गिक प्रवाह अडथळला जात असून पाणी थेट घरांकडे वळत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. संबंधित विभागाने याची सखोल चौकशी करून अतिक्रमणावर कारवाई करावी, अशीही मागणी करण्यात आली आहे.

नागरिकांनी प्रशासनाला तातडीने पाणी निचऱ्याची प्रभावी व्यवस्था करण्याचे, रस्ते व नाल्यांची अपूर्ण कामे प्राधान्याने पूर्ण करण्याचे तसेच अतिक्रमण हटवून कायमस्वरूपी उपाययोजना करण्याचे आवाहन केले आहे. अन्यथा येत्या काळात तीव्र लोकआंदोलन छेडण्याचा इशाराही काही नागरिकांनी दिला आहे.

Previous Post

नायब तहसीलदार आर.पी.सिडाम यांच्याकडे सिरोंचा नगरपंचायतीच्या मुख्याधिकाऱ्यांचा अतिरिक्त प्रभार

Next Post

राजेविश्वेश्वरराव कला वाणिज्य महाविद्यालयातील कर्मचारी रमेश गाडगे यांचे दुःखद निधन

Ashish Ghume

Ashish Ghume

Next Post
राजेविश्वेश्वरराव कला वाणिज्य महाविद्यालयातील कर्मचारी रमेश गाडगे यांचे दुःखद निधन

राजेविश्वेश्वरराव कला वाणिज्य महाविद्यालयातील कर्मचारी रमेश गाडगे यांचे दुःखद निधन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 87.1k Followers
  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

February 2, 2025
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

March 5, 2023
वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

January 5, 2024
सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

October 6, 2022
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

1
रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

1
‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

1
 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

1
२३ ते २८ सप्टेंबरदरम्यान जिल्हाभर पर्यटन महोत्सव; ट्रेकिंग, नेचर वॉक, नाईट कॅम्पिंगसह विविध उपक्रम

२३ ते २८ सप्टेंबरदरम्यान जिल्हाभर पर्यटन महोत्सव; ट्रेकिंग, नेचर वॉक, नाईट कॅम्पिंगसह विविध उपक्रम

September 15, 2026
लसीकरणानंतर बाळाच्या मृत्यूची सखोल चौकशी करा शिवसेना ठाकरे गटाची मागणी; कुटुंबीयांची घेतली भेट

लसीकरणानंतर बाळाच्या मृत्यूची सखोल चौकशी करा शिवसेना ठाकरे गटाची मागणी; कुटुंबीयांची घेतली भेट

September 15, 2026
माजी माओवादी ‘भूपती’च्या नियुक्तीला ग्रामसभेचा विरोध; आदिवासी हक्कांच्या संवेदनशील कामाची जबाबदारी देण्यावर आक्षेप!

माजी माओवादी ‘भूपती’च्या नियुक्तीला ग्रामसभेचा विरोध; आदिवासी हक्कांच्या संवेदनशील कामाची जबाबदारी देण्यावर आक्षेप!

September 7, 2026
होंडा सिटीच्या डिक्कीत देशी दारूचा साठा; ७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

होंडा सिटीच्या डिक्कीत देशी दारूचा साठा; ७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

September 7, 2026

Recent News

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
WhatsApp-Add-1