धामणगाव रेल्वे/ प्रशांत मुन
केंद्र आणि राज्य सरकारच्या गलिच्छ, शेतकरी विरोधी आणि विद्यार्थी विरोधी धोरणांचा जाहीर धिक्कार करण्यासाठी आज धामणगाव रेल्वे येथे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस व युवक काँग्रेसच्या वतीने ‘भव्य न्याय आंदोलन’ छेडण्यात आले. निघालेल्या या धडक मोर्चाने संपूर्ण धामणगाव रेल्वे शहर दणाणून सोडले.
सरकारच्या शेतकरी विरोधी आणि महागाई वाढवणाऱ्या धोरणांवर प्रचंड रोष व्यक्त करत, आंदोलकांनी भर चौकात केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या पुतळ्याचे जाहीर दहन केले. “केंद्र सरकारचे करायचे काय, खाली डोके वर पाय”, “धर्मेंद्र प्रधान राजीनामा द्या” अशा गगनभेदी घोषणा देत कार्यकर्त्यांनी संपूर्ण परिसर डोक्यावर घेतला होता. पुतळा दहनाच्या या आक्रमक पवित्र्यामुळे काही काळ वातावरणात प्रचंड तणाव निर्माण झाला होता.
छत्रपती शिवाजी महाराज चौक ते शास्त्री चौक…
या मोर्चाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून झाली. हातात काँग्रेसचे झेंडे आणि सरकारच्या निषेधाचे फलक घेऊन हजारो कार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते. हा जनसागर केंद्र व राज्य सरकारच्या जुलमी कारभाराचा निषेध करत शास्त्री चौक येथे पोहोचला,
‘या’ ज्वलंत मुद्द्यांवरून सरकारला घेरले:
आंदोलनाचे नेतृत्व करणारे परीक्षित जगताप यांनी आपल्या भाषणातून सरकारवर अत्यंत बोचरी आणि धारदार टीका केली:
पेट्रोल-डिझेल आणि खतांची दरवाढ (शेतकऱ्यांची लूट): आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चे तेल स्वस्त असतानाही देशात पेट्रोल-डिझेलचे दर वाढवून सर्वसामान्यांचे कंबरडे तोडले जात आहे. रासायनिक खतांच्या किमती वाढवून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम हे सरकार करत आहे. हा अन्याय काँग्रेस कदापि सहन करणार नाही, असा इशारा देण्यात आला.
‘नीट’ (NEET) पेपर फुटीचा काळा बाजार: नीट पेपर फुटीच्या घोटाळ्यामुळे लाखो तरुण विद्यार्थ्यांचे भविष्य या सरकारने अंधारात ढकलले आहे. हा केवळ पेपर फुटीचा प्रकार नसून विद्यार्थ्यांच्या स्वप्नांचा खून आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत दोषींना जेलमध्ये टाकण्याची मागणी केली.
शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी हीच आमची मागणी: खोके सरकारच्या काळात शेतकरी आत्महत्या करत असताना सरकार मात्र मश्गूल आहे. शेतकऱ्यांना तात्काळ संपूर्ण कर्जमाफी मिळालीच पाहिजे, हा हक्क आम्ही हिसकावून घेतल्याशिवाय राहणार नाही, असा आक्रमक पवित्रा आंदोलकांनी घेतला.
संपूर्ण काँग्रेस संघटना एकवटली!
या आंदोलनात तालुका काँग्रेस कमिटी, युवक काँग्रेस कमिटी, महिला काँग्रेस, सेवादल आणि काँग्रेसच्या सर्व सेलचे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच हजारो शेतकरी आणि तरुण बांधव रस्त्यावर उतरले होते.
“हे सरकार फक्त आश्वासनांचे फुगे उडवणारे आणि सर्वसामान्यांना लुटणारे सरकार आहे. आज आम्ही पेट्रोलियम मंत्र्यांचा पुतळा जाळून फक्त इशारा दिला आहे, जर सरकारने पेट्रोल-डिझेलचे दर कमी केले नाहीत, नीट घोटाळ्यातील आरोपींना पाठीशी घालणे बंद केले नाही आणि शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली नाही, तर यापुढे काँग्रेस पक्षाच्या वतीने याहूनही अधिक तीव्र आणि हिंसक आंदोलन छेडले जाईल यावेळी जिल्हा बँकेचे संचालक श्रीकांत गावंडे, तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष पंकज वानखडे, शहर काँग्रेस कमिटी कार्याध्यक्ष चंदू डहाणे, बंडूभाऊ जगताप, सचिदानंद काळे,युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष मयूर डुबे, शहर काँग्रेस कमिटी अध्यक्ष आशिष शिंदे, अनुसूचित जाती सेलचे अध्यक्ष अजय तूपसुंदरे, शैलेश निस्ताने, राजूभाऊ भोगे,गजानन चवरे, समीर पाटील,नंदकुमार मानकर, सलीम पठाण, मुकेश राठी,मुकुंद माहोरे, मंगेश बोबडे, मनोज वेरुळकर, सुधीर शेळके,संदीप दावेदार, संजय शेंडे, संजय तायडे, मंगेश ढाले, संजय नन्नवरे, रमाकांत इंगोले, रुपेश गुल्हाने, अतुल वाघ, सुनील भोगे, संदीप भोगे, वैभव पावडे, निवृत्ती वैद्य, अनिस पठाण, गणेश धवणे, गिरीश गाडेकर, राहुल ठाकरे, अविनाश इंगळे, अविनाश दुधे, विजय माकोडे, वैभव पावडे, संजय इंगळे, डॉ प्रमोदराव रोंघे, नितीन देशमुख, अभिषेक खंडारे, बंडू मळापे,अनुप भोगे, अमोल भेंडे, अनुप मोहकार, संतोष पळसापूरे, महबूब भाई ठेकेदार, अर्जुन शिंदे, अक्षय मेश्राम, मुकेश गोफणे, गौरव जयस्वाल, सोनू शेख, नरेंद्र मस्के, राजकुमार माने, नरेंद्र बेराड, किशोर खुरपडे, संकेत उभाळ, विशाल बमनोटे, दामू चवरे, कैलास ऊईके, विशाल डुबे असंख्य कार्यकर्ते व शेतकरी बंधू उपस्थित होते













