भामरागड :- युवा रूरल असोसिएशनच्या २४ व्या वर्धापन दिनानिमित्त ग्रामीण रुग्णालय भामरागड येथे आंतर रुग्ण विभागातील रुग्णांना फळवाटप करून सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न करत वर्धापन दिन साजरा करण्यात आला.
कार्यक्रमात ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांना डॉ. गीतेश बोलीवार यांच्या हस्ते फळांचे वाटप करण्यात आले.
अती प्रभावित मेगा पाणलोट प्रकल्प भारतीय ग्रामीण उपजीविका प्रतिष्ठान (BRLF) यांच्या मार्गदर्शनाखाली युवा रूरल असोसिएशन भामरागडच्या पुढाकाराने तालुक्यातील १५ ग्रामपंचायतींमध्ये पाणलोट अंमलबजावणीचे काम सुरू असून, संस्थेमार्फत विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येत आहेत.
युवा रूरल असोसिएशनच्या २४ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात संस्थेचे व्हिजन व मिशन याबाबत उपस्थितांना माहिती देण्यात आली. युवा रूरल असोसिएशन भामरागडचे टीम लीडर अजय गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम पार पडला तसेच संस्थेच्या कार्यालयात केक कापून वर्धापन दिनाचा आनंद साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाला गावातील प्रतिष्ठित व्यक्ती गोविंद चक्रवर्ती यांची प्रमुख उपस्थिती होती तसेच ग्रामीण रुग्णालयातील राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाचे डॉ. समाधान घुटके, रुग्णालयातील कर्मचारी, नर्सिंग स्टाफ उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी युवा रूरल असोसिएशनचे कार्यकर्ते वसंत शेंडे, दिनेश कोकोडे, शरद यादव, शिल्पा वाचामी, नंदेश्वर पुंगाटी, विष्णू तेलामी, सुरेश तिम्मा, धीरज वेलादी आणि प्रकाश मडावी यांनी विशेष परिश्रम घेतले.













