गोंडपिंपरी :पोलीस स्टेशन गोंडपिंपरी अंतर्गत अवैध दारू वाहतूक करणाऱ्या इसमावर पोलिसांनी धडक कारवाई करत तब्बल ८३ हजार ५५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईमुळे अवैध दारू विक्रेते व तस्करांमध्ये खळबळ उडाली आहे.
प्राप्त माहितीनुसार, आज दिनांक १५ मे २०२६ रोजी गुप्त बातमीदारामार्फत पोलिसांना माहिती मिळाली की, एक इसम दुचाकी मोपेड क्रमांक एमएच 34 सीजी 8877 वरून अवैधरित्या देशी व विदेशी दारूची वाहतूक करणार आहे. या माहितीच्या आधारे ठाणेदार रमेश हत्तीगोटे यांच्या मार्गदर्शनात पोलिसांनी गोंडपिंपरी ते वढोली मार्गावरील क्रीडा संकुलाजवळ नाकाबंदी केली.
दरम्यान, संशयित मोपेड वाहन येताना दिसताच पोलिसांनी त्यास थांबवून चौकशी केली. त्याने आपले नाव अजय पोचुजी जिल्लेवार (वय २४ वर्षे, रा. बेंबाळ ता. मुल) असे सांगितले. वाहनाची तपासणी केली असता त्याच्या मोपेडवर मोठ्या प्रमाणात देशी व विदेशी दारू आढळून आली.
यामध्ये १०० नग देशी दारू रॉकेट संत्रा (९० एमएल) किंमत ४ हजार रुपये, ७ नग ऑफिसर चॉईस (२ लिटर) किंमत १५ हजार ७५० रुपये, ६ नग आयकॉनिक व्हाईट (२ लिटर) किंमत १३ हजार ८०० रुपये तसेच मोपेड वाहन किंमत ५० हजार रुपये असा एकूण ८३ हजार ५५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी आरोपीविरुद्ध पोलीस स्टेशन गोंडपिंपरी येथे महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये कलम ६५(अ)(ई) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी मुल सत्यजित आमले यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार रमेश हत्तीगोटे, पीएसआय वसंत कोसमशिले, एचसी वंदिराम पाल, अनुप कवठेकर, अंबादास सिडाम व मनीषा ठाकरे यांनी पार पाडली.













