• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
  • E-paper
Online News Portal
ADVERTISEMENT
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
Online News Portal
No Result
View All Result
Home चंद्रपूर

महाराष्ट्र तेलंगणा राज्याला जोडणारा वर्धा नदीवरील पूल वाहतुकीसाठी बंद

हजारो नागरिकांचे हाल:रुग्णवाहिकेलाही नो एंट्री

suraj madurwar by suraj madurwar
May 6, 2026
in चंद्रपूर
Reading Time: 1 min read
A A
0
महाराष्ट्र तेलंगणा राज्याला जोडणारा वर्धा नदीवरील पूल वाहतुकीसाठी बंद
Spread the Information

गोंडपिपरी (सुरज माडूरवार)

RelatedPosts

वाईट गोष्टींना नाही म्हणायला शिका; स्वतःचे संरक्षण करण्याची सवय लावा — ओमप्रकाश सोनटक्के

स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला चिमुकल्यांना शैक्षणिक किटचे वाटप

वी दा सावरकरांच्या जीवनपैलूंवर शरद पोंक्षे यांचे व्याख्यान

महाराष्ट्र व तेलंगणा राज्यांना जोडणारा वर्धा नदीवरील महत्त्वाचा पूल आणि राज्य महामार्ग क्रमांक 369 (SH-369) रस्ता खराब होत असल्याने अचानक बंद करण्यात आल्याने सीमावर्ती भागातील हजारो नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. शिरपूर (तेलंगणा) पोलिस विभागाने कोणतीही अधिकृत नोटीस किंवा शासकीय आदेश न देता लोखंडी अडथळे उभारून हा मार्ग बंद केल्याचा आरोप सीमेवरील ग्रामपंचायत पोडसाने केला आहे.

ग्रामपंचायत पोडसाचे सरपंच व प्रशासक देविदास सातपुते यांनी तेलंगणाचे मुख्यमंत्री यांच्याकडे तशी तक्रार सुधा दाखल केली आहे.2008 मध्ये वर्धा नदीवर बांधण्यात आलेला हा पूल पोडसा (महाराष्ट्र) आणि वेंकटरावपेट (तेलंगणा) यांना जोडतो.या प्रकल्पासाठी जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया कायदेशीररीत्या पूर्ण झाली असून,महाराष्ट्र शासनाने संबंधित नुकसानभरपाईही दिली होती. गेल्या 15 वर्षांपासून हा मार्ग सार्वजनिक वापरात आहे.

मात्र अलीकडे अचानक हा रस्ता बंद करण्यात आल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे.विशेषतः हैदराबादकडे जाणाऱ्या रुग्णवाहिकांसाठी हा प्रमुख मार्ग असल्याने वैद्यकीय आपत्कालीन सेवांवर गंभीर परिणाम होत असून रुग्णांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे.तसेच शेतकरी व व्यापाऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे,कारण हा मार्ग छत्तीसगड,मध्यप्रदेश व महाराष्ट्राला दक्षिण भारताशी जोडणारा महत्त्वाचा दुवा आहे.ग्रामपंचायतीने या कारवाईला संविधानातील कलम 19(1)(d) नुसार मिळालेल्या हालचालीच्या स्वातंत्र्याच्या अधिकाराचे उल्लंघन असल्याचे म्हटले आहे.संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ निर्देश देऊन अडथळे हटवावेत आणि SH-369 वरील वाहतूक त्वरित पूर्ववत करावी अशी जोरदार मागणी करण्यात आली आहे.

दरम्यान,या मुद्द्यावर सीमावर्ती भागात संतापाची लाट उसळली असून,लवकरात लवकर मार्ग सुरू न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा स्थानिक नागरिकांनी दिला आहे.

महाराष्ट्र तेलंगणाला जोडणारा पोडसा रस्ता बंद झाल्याने सीमाभागातील सामान्य जनतेचे जगणे अक्षरशः विस्कळीत झाले आहे.रोजंदारीसाठी तेलंगणात जाणाऱ्या मजुरांचे हात कामाविना थांबले, तर व्यापाऱ्यांचे व्यवहार ठप्प झाले आहेत. सर्वात वेदनादायक बाब म्हणजे रुग्णवाहिकाही अडवल्या जात असून, रुग्णांना जीव धोक्यात घालून शेताच्या बांधातून मार्ग काढावा लागत आहे. वेळेवर उपचार न मिळाल्यास जीवितहानीचा धोका वाढला आहे. प्रशासनाने मानवीय दृष्टीकोनातून तात्काळ निर्णय घेऊन हा मार्ग सुरू करावा.अन्यथा न्यायालयीन लढाईसोबतच मोठे जन आंदोलन रस्त्यावर उभारू.

_ देविदास सातपुते (प्रशासक सरपंच पोडसा)

Previous Post

विकास कामांना गतिमान करा: आढावा सभेत आ. डॉ. धर्मराव बाबा आत्राम यांचे निर्देश

Next Post

लग्नाचा खर्च टाळून गावात उभारले ‘ज्ञानमंदिर’; पेवरा येथील नवदांपत्याचा आदर्श उपक्रम

suraj madurwar

suraj madurwar

सुरज माडूरवार हे दैनिक सह्याद्रीचा राखणदारचे २०१६ पासून गोंडपिपरी तालुका प्रतिनिधी म्हणून कार्यरत आहे .

Next Post
लग्नाचा खर्च टाळून गावात उभारले ‘ज्ञानमंदिर’; पेवरा येथील नवदांपत्याचा आदर्श उपक्रम

लग्नाचा खर्च टाळून गावात उभारले ‘ज्ञानमंदिर’; पेवरा येथील नवदांपत्याचा आदर्श उपक्रम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 87.1k Followers
  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

February 2, 2025
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

March 5, 2023
वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

January 5, 2024
सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

October 6, 2022
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

1
रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

1
‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

1
 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

1
२३ ते २८ सप्टेंबरदरम्यान जिल्हाभर पर्यटन महोत्सव; ट्रेकिंग, नेचर वॉक, नाईट कॅम्पिंगसह विविध उपक्रम

२३ ते २८ सप्टेंबरदरम्यान जिल्हाभर पर्यटन महोत्सव; ट्रेकिंग, नेचर वॉक, नाईट कॅम्पिंगसह विविध उपक्रम

September 15, 2026
लसीकरणानंतर बाळाच्या मृत्यूची सखोल चौकशी करा शिवसेना ठाकरे गटाची मागणी; कुटुंबीयांची घेतली भेट

लसीकरणानंतर बाळाच्या मृत्यूची सखोल चौकशी करा शिवसेना ठाकरे गटाची मागणी; कुटुंबीयांची घेतली भेट

September 15, 2026
माजी माओवादी ‘भूपती’च्या नियुक्तीला ग्रामसभेचा विरोध; आदिवासी हक्कांच्या संवेदनशील कामाची जबाबदारी देण्यावर आक्षेप!

माजी माओवादी ‘भूपती’च्या नियुक्तीला ग्रामसभेचा विरोध; आदिवासी हक्कांच्या संवेदनशील कामाची जबाबदारी देण्यावर आक्षेप!

September 7, 2026
होंडा सिटीच्या डिक्कीत देशी दारूचा साठा; ७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

होंडा सिटीच्या डिक्कीत देशी दारूचा साठा; ७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

September 7, 2026

Recent News

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
WhatsApp-Add-1