• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
  • E-paper
Online News Portal
ADVERTISEMENT
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
Online News Portal
No Result
View All Result
Home Uncategorized

फिस्कुटी परिसरात वाघाचा थरारक हल्ला; झोपेत असलेल्या मेंढपाळाचा मृत्यू

Ashish Ghume by Ashish Ghume
March 13, 2026
in Uncategorized
Reading Time: 1 min read
A A
0
फिस्कुटी परिसरात वाघाचा थरारक हल्ला; झोपेत असलेल्या मेंढपाळाचा मृत्यू
Spread the Information

मूल प्रतिनिधी : मूल तालुक्यातील फिस्कुटी परिसरात वाघाने केलेल्या थरारक हल्ल्यात एका मेंढपाळाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी मध्यरात्री घडली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून वन विभागाने तातडीने वाघाचा बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

RelatedPosts

मूलमध्ये १८ ऑक्टोबरला ‘भाऊंचा गरबा महोत्सव’; अभिनेत्री प्रार्थना बेहरे, आमदार सुधीर मुनगंटीवार यांची विशेष उपस्थिती

सेवा संकल्प अभियानांतर्गत मूल येथे डायलिसिस केंद्राचे लोकार्पण

चंद्रपूरच्या हवाईसेवेसाठी आ. सुधीर मुनगंटीवार यांची दिल्लीत आग्रही मागणी; मोरवा विमानतळाबाबत केंद्रीय मंत्र्यांची सकारात्मक भूमिका

मिळालेल्या माहितीनुसार, वासुदेव गणपत कंकलवार (वय ३६) रा. जुनासुर्ला हे मेंढपाळ म्हणून मेंढ्यांची राखण करण्यासाठी फिस्कुटी येथील महाकाली मंदिराजवळ रामदास जेंगठे यांच्या शेतात मेंढ्यांची लाग बसवून झोपले होते. त्यांच्यासोबत त्यांचे भाऊ मारोती कंकलवार यांची पत्नी वनिता कंकलवार देखील उपस्थित होत्या.

दरम्यान, रात्री अंदाजे दीड वाजताच्या सुमारास दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक हल्ला चढविला. झोपेत असलेल्या वासुदेव कंकलवार यांच्यावर वाघाने झडप घातल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली.

घटनेची माहिती मिळताच पोलीस विभाग, वन विभाग तसेच फिस्कुटी येथील सरपंच नितीन गुरनुले यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेण्यात आला असून मूल उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे.

दरम्यान, या घटनेनंतर परिसरातील शेतकरी व मेंढपाळांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. जंगलालगतच्या गावांमध्ये वाघाचा वावर वाढल्याने नागरिकांनी रात्रीच्या वेळी बाहेर पडताना खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात येत असून वाघाचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थांनी वन विभागाकडे केली आहे.

टीप :- बातमीचा फोटो ai जनरेटर आहे

Previous Post

पिशोर येथे विहिरीत बुडून २० वर्षीय युवकाचा मृत्यू

Next Post

वृंदावन सोसायटीत युवकाची धारदार शस्त्राने हत्या; यवतमाळ शहरात खळबळ

Ashish Ghume

Ashish Ghume

Next Post
वृंदावन सोसायटीत युवकाची धारदार शस्त्राने हत्या; यवतमाळ शहरात खळबळ

वृंदावन सोसायटीत युवकाची धारदार शस्त्राने हत्या; यवतमाळ शहरात खळबळ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 87.1k Followers
  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

February 2, 2025
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

March 5, 2023
वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

January 5, 2024
सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

October 6, 2022
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

1
रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

1
‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

1
 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

1
भूसंपादनाविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार; आष्टीत ठिय्या आंदोलनाने महामार्ग ठप्प!

भूसंपादनाविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार; आष्टीत ठिय्या आंदोलनाने महामार्ग ठप्प!

November 3, 2026
मेडीगड्डा बॅरेजवर मुख्य सचिवांची नजर; सिरोंच्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर काय निघणार तोडगा?

मेडीगड्डा बॅरेजवर मुख्य सचिवांची नजर; सिरोंच्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर काय निघणार तोडगा?

November 1, 2026
अवाजवी वीज बिलांविरोधात उद्या आलापल्लीत विराट मोर्चा; आदिवासी विद्यार्थी एकता युवा मंचचा पुढाकार

अवाजवी वीज बिलांविरोधात उद्या आलापल्लीत विराट मोर्चा; आदिवासी विद्यार्थी एकता युवा मंचचा पुढाकार

November 1, 2026
लोहपुरुष सरदार पटेल यांच्या जयंतीनिमित्त अहेरीत सीआरपीएफची ‘रन फॉर युनिटी’; एकतेचा दिला संदेश!

लोहपुरुष सरदार पटेल यांच्या जयंतीनिमित्त अहेरीत सीआरपीएफची ‘रन फॉर युनिटी’; एकतेचा दिला संदेश!

November 1, 2026

Recent News

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
WhatsApp-Add-1