गोंडपिपरी (सुरज माडूरवार)
तालुक्यात वाघाचा धुमाकूळ सुरूच असून गेल्या आठ दहा दिवसांत दोन शेतकऱ्यांचा बळी गेला आहे.चेकपिपरी येथील शेतकरी भाऊजी पाल व गणेशपिपरी येथील महिला शेतकरी अल्का पांडुरंग पेंदोर यांना वाघाने ठार केले.या सलग दोन दुर्दैवी घटनांमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून ग्रामस्थांमध्ये संताप उसळला आहे.
वाघाला तातडीने जेरबंद करण्याची मागणी करत नागरिकांनी गोंडपिपरी येथे एतिहासिक रस्ता रोको आंदोलन केले. ग्रामस्थांच्या वेदना समजून घेण्यासाठी माजी आमदार व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक सुदर्शन निमकर यांनी २८ ऑक्टोबर रोजी मृतकांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. यावेळी त्यांनी गावकऱ्यांशी चर्चा करून परिस्थितीची माहिती घेतली.
निमकर यांनी तत्काळ वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधत नरभक्षक वाघाला लवकरात लवकर जेरबंद करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या. तसेच मृतकांच्या कुटुंबांना योग्य आर्थिक मदत आणि संरक्षणात्मक उपाययोजना करण्याची मागणी केली.
या भेटीदरम्यान बबन.निकोडे,बंडू बोनगिरवार,साईनाथ माष्टे,सुनील झाडे, प्रदीप बोबडे,संतोष सांगाणी,मारोती पोटे, बालाजी चाफले,सतीश वासमवार,रोशन सिडाम,रवी खेरकर यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.













