भारतीय कसोटी क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा याने नुकतेच कसोटी क्रिकेटला अलविदा म्हटले आहे. रोहितच्या या निर्णयानंतर लगेच विराट कोहलीने कसोटी क्रिकेटला रामराम केल्यामुळे क्रिकेट चाहत्यांसाठी मात्र ही अतिशय वाईट बातमी असून लाखो चाहत्यांची निराशा झाली आहे.
भारतीय संघातील सर्वांचा लाडका विराट कोहली याने कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे. विराट कोहलीने सोशल मीडियावर एक पोस्ट करत त्याचा निर्णय जाहीर केला आहे. गेल्या आठवड्यातच त्याने निवृत्त होण्याची माहिती दिली होती. नुकतेच रोहित शर्मा याने कसोटी क्रिकेटला अलविदा म्हटले आहे.
रोहितच्या या निर्णयानंतर लगेच विराट कोहलीने कसोटी क्रिकेटला अलविदा केल्यामुळे क्रिकेट चाहत्यांसाठी मात्र ही अतिशय वाईट बातमी असून लाखो चाहत्यांची निराशा झाली आहे.
विराट कोहलीने त्याच्या १४ वर्षाच्या कारकिर्दीत १२३ कसोटी सामने खेळले, ज्यामध्ये त्याने २१० डावांमध्ये ४६.८५ च्या सरासरीने ९२३० धावा केल्या. पण विराट त्याच्या १० हजार कसोटी धावांच्या स्वप्नापासून अवघा ७७० धावा दूर होता. विराट कोहलीची कसोटी शतकं आणि अर्धशतकांची संख्या जवळजवळ सामान आहे. त्याने कसोटी क्रिकेटमध्ये ३०शतकं आणि ३१ अर्धशतकं झळकावली आहेत.
विराट कोहलीने सोशल मीडियावर एक पोस्ट केली त्यात त्याने असे लिहिले आहे की, कसोटी क्रिकेटमध्ये बॅगी ब्लू प्रथमच परिधान करून आज १४ वर्षे झाली आहेत. खरं सांगायचं तर, हा फॉरमॅट मला कुठे घेऊन जाईल, याची कल्पनाही नव्हती. या फॉरमॅटने माझी परीक्षा घेतली, मला घडवले आणि आयुष्यभर पुरतील अशा अनेक गोष्टी शिकवल्या.
भारतासाठी कसोटी क्रिकेट खेळण्याला हृदयात वेगळं स्थान असतं. कसोटी क्रिकेट म्हणजे परीक्षा घेणारा, दीर्घ आणि संघर्ष पाहणारा फॉरमॅट आहे. हा फॉरमॅट तुम्हाला अगदी छोट्या छोट्या क्षणांचा आनंद देतो, जो आयुष्यभरासाठी आठवणी म्हणून सोबत असतो.
या फॉरमॅट पासून दूर जाणं सोपं नाही, पण हा निर्णय आता योग्य वाटतोय. मी कसोटी क्रिकेटला माझं सर्वस्व दिलं, पण त्यापेक्षा कितीतरी पट जास्त, अगदी माझ्या कल्पनेपेक्षाही जास्त या खेळाने मला परत दिलंय.
मी कृतज्ञतेने भरलेल्या मनाने निवृत्त होत आहे. या खेळासाठी माझ्या सहकाऱ्यांसाठी मला समजून घेणाऱ्यांसाठी आणि साथ देणाऱ्यांसाठी माझं मन कृतज्ञतेने भरून आलंय, माझ्या मनात फक्त आणि फक्त कृतज्ञताच आहे.
विराट कोहलीने आतापर्यंत १२३ टेस्ट, २१० इनिंग्स, ९२३० रन, ४६.८५ ऍव्हरेज, ३० शतक, ३१ अर्धशतक, ३०२ वनडे, २९० इनिंग्स, १४१८१ रन, ५७.८८ ऍव्हरेज, ५१ शतक, ७४ अर्धशतक, ५ विकेट, १२५ टी २०, ११७ इनिंग्स, ४१८८ रन, ४८.६९ ऍव्हरेज, १ शतक, ३८ अर्धशतक, ४ विकेट घेतले आहेत.













