*पाकिस्तान कडून शस्त्रसंधीचे उल्लंघन.*
अमेरिकेच्या मध्यस्थीनंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्धविराम लागू करण्यात आला होता. मात्र, अवघ्या चार तासांमध्येच पाकिस्तानने पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन करत युद्धविराम तोडला आहे. जम्मू, राजौरी आणि बारामुल्ला परिसरात पाकिस्तानी सैन्याने गोळीबार केला असून, जम्मू परिसरात पुन्हा एकदा ड्रोन दिसल्याची माहिती समोर आली आहे.
अमेरिकेच्या मध्यस्थीनंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात आज सायंकाळी ५ वाजल्यापासून युद्धविराम लागू करण्यात आला होता. मात्र, अवघ्या चार तासांमध्येच पाकिस्तानने पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन करत युद्धविराम तोडला आहे. जम्मू, राजौरी आणि बारामुल्ला परिसरात पाकिस्तानी सैन्याने गोळीबार केला असून, जम्मू परिसरात पुन्हा एकदा ड्रोन दिसल्याची माहिती समोर आली आहे.
राजस्थानमध्येही दोन ठिकाणी ड्रोन हालचाली पाहायला मिळाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर जम्मू परिसरात ब्लॅकआउट करण्यात आला आहे. श्रीनगरमध्येही स्फोटांचे आवाज ऐकू आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
आज दुपारी ३ वाजून १५ मिनिटांनी पाकिस्तानच्या डीजीएमओने (DGMO) भारताच्या डीजीएमओला फोन करून युद्धविरामाची तयारी दर्शवली होती. त्यानंतर सायंकाळी ५ वाजल्यापासून युद्धविराम लागू झाला. परराष्ट्र सचिवांनी पत्रकार परिषद घेऊन याबाबतची अधिकृत माहिती दिली होती. मात्र, अवघ्या चार तासांनंतर पाकिस्तानकडून युद्धविरामाचे उल्लंघन करून गोळीबार करण्यात आला.
पाकिस्तानच्या या नापाक हालचालींना भारतीय सैन्याकडूनही तात्काळ आणि चोख प्रत्युत्तर देण्यात आले. केंद्र सरकारकडून भारतीय सैन्याला कठोर कारवाईचे आदेश देण्यात आले असून, सीमाभागांमध्ये सुरक्षा आणखी वाढवण्यात आली आहे. या घटनेमुळे दोन्ही देशांमधील तणाव पुन्हा एकदा उफाळून येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.













