गोंडपिपरी (प्रतिनिधी – सुरज माडूरवार)
गोंडपिपरी तालुक्यातील ५० ग्रामपंचायतींसाठी सरपंच पदाचे आरक्षण बुधवारी (दि. २३ एप्रिल) पंचायत समिती सभागृहात पार पडले. दुपारी दोन वाजता झालेल्या या सभेत प्राधिकृत अधिकारी तहसीलदार शुभम बहाकर यांच्या अध्यक्षतेखाली आरक्षण सोडत प्रक्रिया पार पडली.
या वेळी सरपंच पदासाठी खुल्या व विविध राखीव प्रवर्गांत आरक्षण जाहीर करण्यात आले. त्यात महिलांसाठी २६ जागा आरक्षित असून, उर्वरित जागा सामान्य, ओबीसी, अनुसूचित जाती व जमातींसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत.
खुल्या प्रवर्गातील महिला आरक्षण (१३ ग्रामपंचायती)
घडोली, चक बोरगाव, धामणगाव, गणेशपिपरी, वढोली, आकसापूर, वेडगाव, हिवरा, किरमिरी, पानोरा, सुपगाव, विठलवाडा, सोनापुर देशपांडे
खुल्या प्रवर्गातील सामान्य आरक्षण (११ ग्रामपंचायती)
परसोडी, गोजोली (मक्ता), डोंगरगाव, सोमनपल्ली, चक लिखितवाडा, वेजगाव, विहीरगाव, चक पारगाव, करंजी, तोहगाव, धाबा
इतर मागास प्रवर्ग (ओबीसी) – एकूण ७ ग्रामपंचायती
महिला आरक्षण – तारडा, चक नांदगाव, चक घडोली, कुडेसावली
सामान्य आरक्षण – नांदगाव, खरारपेठ, लाठी
अनुसूचित जमाती (एसटी) – एकूण ९ ग्रामपंचायती
महिला आरक्षण – चेकदरूर, तारसा (बूज), सालेजरी, नंदवर्धन, पोडसा
सामान्य आरक्षण – कोरंबी, दरुर, बोरगाव, सकमुर
अनुसूचित जाती (एससी) – एकूण ९ ग्रामपंचायती
महिला आरक्षण – कन्हाळगाव, फुरडी हेटी, वडकुली, चेक बेरडी, वटराणा
सामान्य आरक्षण – धानापुर, अडेगाव, चेक दुबारपेठ, चेकपिपरी
या आरक्षण प्रक्रियेमुळे स्थानिक स्वराज्य संस्थांतील प्रतिनिधित्वात विविध समाजघटकांना संधी मिळणार आहे. यामुळे गावपातळीवरील नेतृत्व अधिक समतोल होण्यास मदत होणार असल्याचे मत स्थानिकांनी व्यक्त केले.













