प्रतिनिधी नानासाहेब ननवरे
कुरुळ : जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा झरे येथे दरवर्षी मोठ्या उत्साहात महिला मेळावा संपन्न होतो त्याप्रमाणेच यावर्षीही मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून गटशिक्षण अधिकारी श्री राजकुमार पाटील साहेब उपस्थित होते
यावर्षी या मेळाव्यास विशेष महत्व यासाठी होते की जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा झरे येथे पूर्वी मुख्याध्यापक म्हणून कार्यरत असलेले व करमाळा तालुक्याचे माजी तालुका मास्तर कै.कोळी गुरुजी यांचे स्मरणार्थ त्यांचे चिरंजीव श्री सुनील बळवंत (कोळी) साहेब व बळवंत परिवार यांचेकडून शाळेसाठी प्रवेशद्वार भेट म्हणून बनवून देण्यात आले.या शाळेतील माजी शिक्षकांच्या स्मरणार्थ प्रवेशद्वार शाळेस भेट दिले मुळे यास विशेष महत्व होते.
यावेळी करमाळा तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी श्री राजकुमार पाटील साहेब,ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी बदे साहेब, सुनिल बळवंत साहेब, पद्माकर खडके,केंद्रप्रमुख ससाणे साहेब,शालेय पोषण आहार चे अधीक्षक बांगर साहेब, प्रहार ता. उपाध्यक्ष सोमनाथ जाधव, मुख्याध्यापक श्री भागवत गर्जे,उत्तर वडगाव शाळेचे मुख्याध्यापक श्री देवेंद्र जाधवर,अडेकर वस्ती शाळेचे मुख्याध्यापक संपत नलवडे सर तसेच केंद्रातील सर्व मुख्याध्यापक व अंगणवाडी सेविका यांच्या उपस्थितीत प्रवेशद्वाराचे उद्घाटन करण्यात आले. सदर प्रवेशद्वारास कै. कोळी गुरुजी यांच्या स्मरणार्थ लावलेल्या बोर्डाचे अनावरण करण्यात आले.त्यानंतर करमाळा तालुक्याचे गटविकास अधिकारी श्री राऊत साहेब यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या सायन्स वॉल चे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी कार्यक्रमामध्ये बोलताना गटशिक्षणाधिकारी श्री पाटील साहेब यांनी शाळेमधील लोकसहभाग व शिक्षकांचे कौतुक केले तसेच सुनील बळवंत साहेब यांनी जे शाळेसाठी प्रवेशद्वार भेट दिले त्याबद्दल त्यांचे कौतुक केले व महिला दिनानिमित्त प्रेरणादायी विचार मांडले.यावेळी विस्तार अधिकारी श्री बदे साहेब यांनी झरे शाळेबद्दल च्या जुन्या आठवणींना उजाळा दिला तसेच ज्यांच्या स्मरणार्थ प्रवेशद्वार दिले आहे त्यांच्यासोबतच्या आठवणीही सांगितल्या तसेच सुनील बळवंत यांना धन्यवाद दिले व अलीकडील तीन वर्षात शाळेमध्ये जे बदल घडून आले आहेत त्याबद्दल शिक्षकांचे कौतुक केले.
सुनील बळवंत साहेब यांनी विचार मांडताना कोळी गुरुजी यांच्या आठवणींना उजाळा दिला व त्यांच्या कारकिर्दीची माहिती दिली. यावेळी उपस्थित सर्व मान्यवरांना बळवंत साहेब यांचेकडून सर्व मान्यवरास भगवद् गीता या ग्रंथाचे वाटप करण्यात आले व यापुढेही दरवर्षी इयत्ता चौथी च्या वर्गात
पहिल्या तीन क्रमांकाच्या विद्यार्थ्यांना तीन हजार रुपयांचे बक्षीस देण्याचे जाहीर केले.
प्रास्ताविक करतांना शाळेचे मुख्याध्यापक श्री भागवत गर्जे यांनी शाळेमध्ये लोकसहभागातून व ग्रामपंचायतीच्या माध्यमातून झालेल्या कामाची व प्रस्तावित माहिती दिली.
तत्पूर्वी महिलांच्या विविध स्पर्धा घेण्यात आल्या होत्या त्यांचे बक्षीस वितरण मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. शेवटी करमाळा येथून बोलावलेल्या महिला कलावंताचा एकपात्री नाटकाचा प्रयोग महीलांसमोर सादर करण्यात आला.
कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणात महिला उपस्थित होत्या.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री भागवत गर्जे सर,सुधीर माने सर,अमृत सोनवणे सर,अंगणवाडी सेविका कुंभार मॅडम,गुळवे मॅडम,जोशी मॅडम,कोळी मॅडम, मिटे मॅडम, अम्रुळे मॅडम,मोरे मॅडम,बैरागी मॅडम, मुसळे मॅडम इत्यादिंनी परिश्रम घेतले.
सदर कार्यक्रमाचे भारदस्त असे सूत्रसंचालन श्री राजकुमार खाडे सर यांनी केले ,अध्यक्षीय सूचना श्री.सुधीर माने सर यांनी मांडली तर अनुमोदन व आभार श्री अमृत सोनवणे सर यांनी मानले.शेवटी सर्वांना अल्पोपहार देण्यात आला .