कोरची/ गडचिरोली
जिथे श्रमजीवी नांदते तेथेच लक्ष्मी नांदते या उक्ती ची प्रचीती तालुका मुख्यालयापासुन जवळच असलेल्या बेलगांव घाट येथील प्रगतशील शेतकरी महिला रसिका गावतुरे यांचेकडे पाहुन येते. सुरवातीला घरी एकर भर वडीलोपार्जित शेती असतांना कुटुंबाचा गाळा हाकणे सुध्दा कठीण होते यातच स्व कतुत्वार आत्याधुनिक शेती करीत स्व बळावर पाच एकर शेती घेत रसिका बाईनी एक आदर्श समोर ठेवला आहे. कृषी विभागाच्या वतीने आदर्श शेतकरी पुरस्कार प्राप्त असलेल्या रसिकाबाईनी पारंपारीक शेतीला बगल देत कृषी विभागाच्या सह्याने आधुनिक यंत्राचा वापर करुन आपल्या शेती उत्पन्नात वाढ केलेला आहे. विशेष म्हणजे त्यांच्याकडे असलेल्या रोवणी यंत्र, पेरणी यंत्र, धान कापणी यंत्र, व इतर सर्व यंत्राचा ते स्वत: चालवितात.
कोरची सारख्या नक्षल ग्रस्त, दुर्गम भागात वास्तव्यास असलेल्या रसिकाबाईनी आपल्या कुटुंबा मार्फत घेण्यात येणा-या धान पिकाच्या उत्पन्नावरच अवलंबुन न राहता त्यांनी नव नविन जातीच्या भाजीपालांची लागवड करतात. प्रामुख्याने रासायनीक खताचा वापर न करता सेंद्रीय पध्दतीने शेती करीत मोठ्या प्रमाणावर भाजीपाल्यांचे उत्पन घेतात. ते केवळ उत्पन्न घेवून थांबले नाही तर स्वत: दुचाकीने तालुक्याच्या ठिकाणी परिसरातील गावांमध्ये विक्रीसाठी नेत असतात.
रसिकाबाईनी केवळ स्वतः पुरतेच मर्यादीत न रहाता आपल्या गावी महाराष्ट्र राज्य ग्रामिण जीवनोन्नती च्या माध्यमातुन वंदना स्वंय सहाय्यता समुहाची स्थापना करुन या समुहाच्या माध्यमातुन त्यांनी तालुक्यात मोठ्या प्रमाणात असलेल्या जांभुळ विक्रीसाठी नागपुर येथे घेवून जातात त्यांच्या या कल्पकतेचा फायदा त्यांच्या समुहातील इतर महिलांना सुध्दा होत आहे. त्यांचे अनुकरण करीत तालुक्यातील महिलांनी त्यांना आपल्या कोटरा -बिहीटेकला या प्रभागा अंतर्गत कार्यरत असलेल्या आई महिला प्रभाग संघाचे अध्यक्ष पद दिलेले आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेत जिल्हा प्रशासनाने कृषी महोत्सव 2018 मध्ये सन्मांनीत केलेले आहे. तसेच मित्रांगण मंच कोरची च्या वतीने देण्यात येणारा तालुका गौरव पुरस्काराने 2017 मध्ये त्यांना गौरविण्यात आलेले आहे. नाशीक येथे आयोजित कृषीथॉन कृषी प्रदर्शनी मध्ये सुध्दा त्यांना सन 2014 मध्ये सन्मान्मानीत करण्यात आले. तसेच त्यांनी स्थापन केलेल्या वंदना समुहाला “हिरकणी नवउदयोजक महाराष्ट्राची,” या पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले तसेच कृषी विभागाच्या वतीने सुध्दा त्यांना वेळोवेळी पुरस्कृत करण्यात आले आहे