चंद्रपूर |
बल्लारपूर तालुक्यातील युवकांनी आज (10 एप्रिल) शिवसेनेच्या युवा सेनेत सामील होत आपली ताकद दाखवून दिली. जिल्हा कार्यालय तिर्थरुप नगर, तुकूम येथे पार पडलेल्या भव्य कार्यक्रमात, जिल्हाप्रमुख शैलेश केळझरकर यांच्या प्रेरणादायी नेतृत्वावर विश्वास ठेवून युवकांनी पक्षप्रवेश केला. या घटनेमुळे तालुक्यातील राजकारणात उत्सुकता निर्माण झाली आहे.

या प्रसंगी चंदन तीलोक यांची बल्लारपूर तालुका प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली. त्यांच्यासह युवासेनेच्या नव्या टीममध्ये जोश आणि जिद्द दिसून आली.
कार्यक्रमाला महानगरप्रमुख पवन यादव, तालुका सचिव अक्षय पवार, शहर उपाध्यक्ष कमलाकर कुडमेथे हे उपस्थित होते.
मुख्य नेते एकनाथ शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांच्या आदेशानुसार व युवा सेना सचिव किरण साठी, प्रवक्ते राहुल लोंढे, शुभम नवले आणि हर्षल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.
प्रवेश घेणाऱ्यांमध्ये सुनील टेकाम, विनोद कन्नाके, उमेश आवडे, राजीव जादव, अंकित मून, अनिकेत पासपुरकर, अमन सोमकुवार, करमा चिट्टी, राहुल जुनी, धनु चिट्ठी यांचा समावेश होता.
या सामूहिक प्रवेशामुळे बल्लारपूर तालुक्यात युवासेनेचा प्रभाव निश्चितपणे वाढणार, असा विश्वास व्यक्त करण्यात येतोय.













