• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
  • E-paper
Online News Portal
ADVERTISEMENT
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
Online News Portal
No Result
View All Result
Home चंद्रपूर

वरोऱ्यात उद्या घरकुल लाभार्थ्यांना जप्त वाळूचे वाटप

Ashish Ghume by Ashish Ghume
March 27, 2025
in चंद्रपूर
Reading Time: 1 min read
A A
0
वरोऱ्यात उद्या घरकुल लाभार्थ्यांना जप्त वाळूचे वाटप
Spread the Information

वरोरा :– वरोरा तहसील कार्यालयाने अवैध वाळू उत्खनन प्रकरणांमध्ये जप्त करण्यात आलेली ५८ ब्रास वाळू उद्या (२८ मार्च) घरकुल योजनांच्या लाभार्थ्यांना वितरित करण्याचा निर्णय घेतला आहे. शासनाच्या निर्देशानुसार, जप्त वाळूचा उपयोग सामाजिक व विकासात्मक कार्यांसाठी करण्याची तरतूद आहे. त्यामुळे प्रधानमंत्री आवास योजना, रमाई आवास योजना, शबरी आवास योजना आणि यशवंतराव चव्हाण आवास योजनेच्या लाभार्थ्यांना ही वाळू वितरित केली जाणार आहे.

RelatedPosts

वाईट गोष्टींना नाही म्हणायला शिका; स्वतःचे संरक्षण करण्याची सवय लावा — ओमप्रकाश सोनटक्के

स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला चिमुकल्यांना शैक्षणिक किटचे वाटप

वी दा सावरकरांच्या जीवनपैलूंवर शरद पोंक्षे यांचे व्याख्यान

सन २०२१ ते २०२४ या कालावधीत वाळू चोरीच्या ३१ गुन्ह्यांमध्ये वाहतूक करताना जप्त झालेली वाळू पोलीस ठाणे, वरोरा येथे जमा करण्यात आली होती. महसूल व वन विभागाच्या आदेशानुसार, ही वाळू गरजू घरकुल लाभार्थ्यांना मोफत वितरित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे वाळूअभावी रखडलेली घरकुलाची कामे वेगाने सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

वाळू वाटपाची प्रक्रिया २८ मार्च २०२५ रोजी सकाळी १०:०० ते सायंकाळी ६:०० वाजेपर्यंत पोलीस ठाणे, वरोरा येथे पार पडणार आहे. लाभार्थ्यांनी स्वतः वाहतूक व्यवस्था (ट्रॅक्टर/टिपर) करून उपस्थित राहणे बंधनकारक आहे. त्यांना शून्य महसुली वाहतूक परवाने तहसील कार्यालयामार्फत वितरित केले जातील.

वाळू वितरणाची प्रक्रिया काटेकोर आणि पारदर्शक पद्धतीने पार पाडण्यासाठी महसूल विभागाच्या मार्गदर्शनानुसार दोन विशेष पथके नेमण्यात आली आहेत. या पथकांच्या देखरेखीखाली वाळू वाटप होणार आहे. लाभार्थ्यांचे बांधकाम सुरू असल्याची खात्री करूनच त्यांना वाळू दिली जाणार आहे. तसेच वाहतुकीसाठी वापरण्यात येणाऱ्या वाहनांची संपूर्ण नोंद ठेवली जाणार असून, संपूर्ण प्रक्रियेचे GPS फोटो आणि व्हिडीओ चित्रीकरण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

तहसीलदार योगेश कोटकर यांनी स्पष्ट सूचना दिल्या आहेत की, वाळू वाटप प्रक्रियेत कोणताही गैरव्यवहार झाल्यास जबाबदार अधिकाऱ्यांवर फौजदारी कारवाई केली जाईल. त्याचबरोबर, कोणत्याही परिस्थितीत वाळूचा विनियोग शासनाच्या उद्दिष्टांनुसार झाला पाहिजे, यासाठी विशेष खबरदारी घेतली जाणार आहे.

योजनेअंतर्गत राजु अण्णाजी तुमराम, अनिला हरीचंद्र नन्नावरे, नरेश प्रभाकर कोडापे, गोविंदा उध्दवराव सपाटे, रेखा रमेश भोयर, सविता विलास विडे, संगीता ऋषी कुळमेथे, ईश्वर गोमाजी परचाके, मंजुळाबाई विश्वनाथ आसुटकर, रामकृष्ण पुनाराम चौधरी, मधुकर शंकर इंगळे, दादाजी हाजी हरबाजी आसुटकर, अजाब शंकर इंगळे, वासुदेव उध्दवराव सपाटे, राजू नानाजी मेश्राम, अशोक वामन येरणे आणि मन्साराम गाविंदा मसराम या लाभार्थ्यांना प्रत्येकी ३ ब्रास वाळू वितरित करण्यात येणार आहे.

या निर्णयामुळे वाळूअभावी रखडलेली घरकुल कामे लवकर सुरू होणार असून, घरकुल लाभार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. शासनाच्या योजनांचा प्रत्यक्ष लाभ गरजू नागरिकांना मिळावा आणि वाळूच्या टंचाईमुळे होणारा विलंब दूर व्हावा, यासाठी प्रशासनाने घेतलेला हा निर्णय महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

Previous Post

किल्ले रायगडावरील वाघ्या कुत्र्याचे स्मारक तिथेच राहिले पाहिजे.

Next Post

अनुदान लाभार्थ्यांना हयात प्रमाणपत्र सादर करण्याचे आवाहन

Ashish Ghume

Ashish Ghume

Next Post
अनुदान लाभार्थ्यांना हयात प्रमाणपत्र सादर करण्याचे आवाहन

अनुदान लाभार्थ्यांना हयात प्रमाणपत्र सादर करण्याचे आवाहन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 87.1k Followers
  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

February 2, 2025
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

March 5, 2023
वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

January 5, 2024
सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

October 6, 2022
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

1
रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

1
‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

1
 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

1
२३ ते २८ सप्टेंबरदरम्यान जिल्हाभर पर्यटन महोत्सव; ट्रेकिंग, नेचर वॉक, नाईट कॅम्पिंगसह विविध उपक्रम

२३ ते २८ सप्टेंबरदरम्यान जिल्हाभर पर्यटन महोत्सव; ट्रेकिंग, नेचर वॉक, नाईट कॅम्पिंगसह विविध उपक्रम

September 15, 2026
लसीकरणानंतर बाळाच्या मृत्यूची सखोल चौकशी करा शिवसेना ठाकरे गटाची मागणी; कुटुंबीयांची घेतली भेट

लसीकरणानंतर बाळाच्या मृत्यूची सखोल चौकशी करा शिवसेना ठाकरे गटाची मागणी; कुटुंबीयांची घेतली भेट

September 15, 2026
माजी माओवादी ‘भूपती’च्या नियुक्तीला ग्रामसभेचा विरोध; आदिवासी हक्कांच्या संवेदनशील कामाची जबाबदारी देण्यावर आक्षेप!

माजी माओवादी ‘भूपती’च्या नियुक्तीला ग्रामसभेचा विरोध; आदिवासी हक्कांच्या संवेदनशील कामाची जबाबदारी देण्यावर आक्षेप!

September 7, 2026
होंडा सिटीच्या डिक्कीत देशी दारूचा साठा; ७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

होंडा सिटीच्या डिक्कीत देशी दारूचा साठा; ७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

September 7, 2026

Recent News

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
WhatsApp-Add-1