मा.आमदार अशोक पवारांना शिरूरमध्ये मोठा धक्का!
शिरूर तालुका खरेदी-विक्री संघाचे व्हॉइस चेअरमन व नवनिर्वाचित संचालकांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.
आज मुंबई येथे झालेल्या या प्रवेश सोहळ्यात संघाचे व्हॉइस चेअरमन बाळासाहेब नागवडे, संचालक सर्जेराव दसगुडे, नवनाथ ढमढेरे, मनिषा शेलार यांच्यासह नाना पाचर्णे, बाळासाहेब टेमगिरे, लहू थोरात यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला.
या वेळी क्रीडा मंत्री दत्ता भरणे, माजी आमदार पोपटराव गावडे, कात्रज दूध संघाचे चेअरमन स्वप्नील ढमढेरे, पुणे जिल्हा युवक अध्यक्ष अण्णासाहेब महाडिक, शिरूर तालुका राष्ट्रवादी अध्यक्ष रविबापू काळे, बाजार समितीचे माजी सभापती प्रकाशबापू पवार, खरेदी विक्री संघाचे चेअरमन राजेंद्र नरवडे, शिरूर-आंबेगाव राष्ट्रवादी अध्यक्ष मानसिंग पाचूदकर, जिल्हा नियोजन समिती सदस्य राहुलदादा पाचारणे, युवा नेते स्वप्निलभैय्या गायकवाड, कारखान्याचे माजी संचालक राजेंद्र गावडे, शहराध्यक्ष शरदभाऊ कालेवार, माजी संचालक कैलासराव सोनवणे, संघाच्या संचालिका सुजाताताई नरवडे, शिरूर शहर राष्ट्रवादी महिला अध्यक्षा श्रुतिकाताई झांबरे, शिरूर तालुका राष्ट्रवादी युवती अध्यक्षा तज्ञिकाताई कर्दिले, शिरूर तालुका युवक अध्यक्ष अमोल वर्पे, शहर माजी अध्यक्ष रंजनभैय्या झांबरे व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

या वेळी शिरूर तालुका खरेदी-विक्री संघाच्या चेअरमनपदी निवड झाल्याबद्दल राजेंद्र नरवडे आणि व्हॉइस चेअरमन बाळासाहेब नागवडे यांचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
या प्रवेशामुळे शिरूरमध्ये आमदार अशोक पवार यांना मोठा धक्का बसल्याचे राजकीय तज्ज्ञ मानत आहेत.













