• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
  • E-paper
Online News Portal
ADVERTISEMENT
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
Online News Portal
No Result
View All Result
Home चंद्रपूर

चांगल्या कामांत सुधीरभाऊ नेहमी पुढे – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

गायत्री परिवारतर्फे मुंबईत दिव्य अखंड दीप शताब्दी सोहळा उत्साहात

Ashish Ghume by Ashish Ghume
March 24, 2025
in चंद्रपूर, महाराष्ट्
Reading Time: 1 min read
A A
0
चांगल्या कामांत सुधीरभाऊ नेहमी पुढे – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
Spread the Information

चंद्रपूर – गायत्री परिवाराच्या वतीने आयोजित दिव्य अखंड दीप महायज्ञ आणि दिव्य ज्योती कलश पूजन सोहळ्यात प्रज्वलित झालेल्या दीपांच्या उजेडाने जीवनातील अंधःकार नाहीसा होईल, असा विश्वास राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला. समाजात रोज मनामध्ये राम आणि रावण यांचे युद्ध होत असते. या संघर्षात रामच जिंकला पाहिजे, ही गायत्री परिवाराची शिकवण राष्ट्रनिर्माणासाठी मार्गदर्शक ठरत असल्याचे त्यांनी नमूद केले.

RelatedPosts

वाईट गोष्टींना नाही म्हणायला शिका; स्वतःचे संरक्षण करण्याची सवय लावा — ओमप्रकाश सोनटक्के

स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला चिमुकल्यांना शैक्षणिक किटचे वाटप

वी दा सावरकरांच्या जीवनपैलूंवर शरद पोंक्षे यांचे व्याख्यान

मुंबईतील मुलुंड येथे झालेल्या या भव्य सोहळ्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच डॉ. चिन्मय पंड्या, आमदार मिहिर कोटेचा यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सुधीर मुनगंटीवार यांच्या कार्याची प्रशंसा करताना ते चांगल्या कामांत नेहमी अग्रेसर असल्याचे गौरवोद्गार काढले.

गायत्री परिवाराच्या या महायज्ञाच्या निमित्ताने आत्मशुद्धी, धर्म आणि राष्ट्रहिताच्या संकल्पना उपस्थितांसमोर मांडताना मुनगंटीवार म्हणाले, “संपूर्ण जग जिंकणाऱ्या सिकंदराने मृत्यूपूर्वी सांगितले होते की, कफन पेटीच्या बाहेर माझे दोन्ही हात ठेवा, जेणेकरून लोकांना समजेल की तो रिकाम्या हाताने जात आहे. मात्र, आपली भारतीय संस्कृती अधिक व्यापक आहे. आत्मा कधीच रिकाम्या हाताने येत नाही आणि जातही नाही. पूर्वसंचिताचे संस्कार आत्मा पुढील जन्मातही घेऊन जातो. त्यामुळे धन शेवटच्या श्वासापर्यंत उपयोगी ठरते, पण धर्माचा संस्कार पुढील जन्माच्या पहिल्या श्वासापासूनच महत्त्वाचा ठरतो.”

रामराज्याच्या संकल्पनेबाबत विचार मांडताना मुनगंटीवार म्हणाले, “लहानपणी शाळेत असताना शिक्षक रामराज्याची महती सांगायचे. महात्मा गांधीजींनीही रामराज्याचे स्वप्न पाहिले. त्यावेळी विज्ञान, संगणक, पिझ्झा हट नव्हते, तरीही रामराज्याची गरज का आहे, हा प्रश्न मला पडायचा. पण नंतर उमगले की झगमगाट हा केवळ बाह्य समाधानासाठी असतो, तर रामराज्य मनःशांतीसाठी आवश्यक आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुधीर मुनगंटीवार यांच्या विविध कार्यांची प्रशंसा करताना सांगितले की, “छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रातील गडकिल्ले आणि मंदिरांचे संवर्धन करण्यासाठी सुधीरभाऊंनी मोठे कार्य केले आहे. मागील वर्षी नवी मुंबईत भव्य अश्वमेध यज्ञाचे आयोजन करण्यात आले होते. त्या यज्ञाचे कर्ताधर्ता सुधीरभाऊ होते. समाज आणि धर्महिताच्या प्रत्येक कार्यात ते नेहमी पुढे असतात.”
गायत्री परिवाराने अध्यात्म आणि समाजसेवेच्या माध्यमातून जनकल्याणाची दिशा दिली आहे. या शताब्दी सोहळ्याच्या निमित्ताने देशभरातून अनेक साधक, संत आणि समाजसेवक मुंबईत एकत्र आले होते. दीप महायज्ञाच्या माध्यमातून आत्मिक उन्नतीसाठी प्रेरणा देण्याचे कार्य गायत्री परिवार सातत्याने करत आहे.

या भव्य सोहळ्यात दीपप्रज्वलनाच्या माध्यमातून अंधःकार हटवण्याचा आणि सकारात्मक ऊर्जेला बल मिळवण्याचा संदेश देण्यात आला. धार्मिक, सामाजिक आणि राष्ट्रीय उन्नतीच्या या पर्वात सुधीर मुनगंटीवार यांचा सक्रीय सहभाग महत्त्वपूर्ण ठरला.

Previous Post

गडचांदूर येथे भव्य महाआरोग्य शिबीर; १५९० रुग्णांची मोफत तपासणी, ३९२ शस्त्रक्रियेस पात्र

Next Post

शिक्षक, शिक्षण आणि राष्ट्रहितासाठी शिक्षक परिषद दृढपणे उभी राहणार

Ashish Ghume

Ashish Ghume

Next Post
शिक्षक, शिक्षण आणि राष्ट्रहितासाठी शिक्षक परिषद दृढपणे उभी राहणार

शिक्षक, शिक्षण आणि राष्ट्रहितासाठी शिक्षक परिषद दृढपणे उभी राहणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 87.1k Followers
  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

February 2, 2025
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

March 5, 2023
वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

January 5, 2024
सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

October 6, 2022
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

1
रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

1
‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

1
 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

1
२३ ते २८ सप्टेंबरदरम्यान जिल्हाभर पर्यटन महोत्सव; ट्रेकिंग, नेचर वॉक, नाईट कॅम्पिंगसह विविध उपक्रम

२३ ते २८ सप्टेंबरदरम्यान जिल्हाभर पर्यटन महोत्सव; ट्रेकिंग, नेचर वॉक, नाईट कॅम्पिंगसह विविध उपक्रम

September 15, 2026
लसीकरणानंतर बाळाच्या मृत्यूची सखोल चौकशी करा शिवसेना ठाकरे गटाची मागणी; कुटुंबीयांची घेतली भेट

लसीकरणानंतर बाळाच्या मृत्यूची सखोल चौकशी करा शिवसेना ठाकरे गटाची मागणी; कुटुंबीयांची घेतली भेट

September 15, 2026
माजी माओवादी ‘भूपती’च्या नियुक्तीला ग्रामसभेचा विरोध; आदिवासी हक्कांच्या संवेदनशील कामाची जबाबदारी देण्यावर आक्षेप!

माजी माओवादी ‘भूपती’च्या नियुक्तीला ग्रामसभेचा विरोध; आदिवासी हक्कांच्या संवेदनशील कामाची जबाबदारी देण्यावर आक्षेप!

September 7, 2026
होंडा सिटीच्या डिक्कीत देशी दारूचा साठा; ७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

होंडा सिटीच्या डिक्कीत देशी दारूचा साठा; ७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

September 7, 2026

Recent News

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
WhatsApp-Add-1