गोंडपिपरी – ( सुरज माडूरवार )
नागपुरात कबर हटवण्याची मागणीवरून सोमवारी दि.(१७) मार्च मोठा तणाव निर्माण झाला.दोन गटात दगडफेक झाली दंगल पेटली.दंगल प्रकरणी आतापर्यंत ९२ लोकांना अटक करण्यात आली.हिंसाचारात निरअपराध जखमी इरफान अन्सारी याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.अनेक वाहनांची तोडफोड करण्यात आली सार्वजनिक मालमत्तेची नुकसान झाली.याचे पडसाद समाजात उमटत असतात. नागपूरच्या घटनेच्या पार्श्वभुमीवर गोंडपिपरी पोलिसांनी सतर्कता भाळगत नागरिकांना महत्त्वाच्या सूचना पाळण्यासाठी ठाणेदार रमेश हत्तिगोटे यांच्या उपस्थितीत दि.(२२)शनिवारी पोलीस स्टेशन येथे चिंतन बैठक आयोजित केली.यावेळी मुख्यधिकारी विवेक चौधरी, पीएसआय मंगेश कराडे, बाजार समिति माजी सभापती सुरेश चौधरी, डॉ नदीम सय्यद यांच्या सह अनेकांनी आपले मनोगत व्यक्त केले.यावेडी मुस्लिम व हिंदू बांधव,अनेक सामाजिक कार्यकर्ते,राजकीय पदाधिकारी,पत्रकार,ज्येष्ठ नागरिक,प्रतिष्ठित व्यापाऱ्यांचीही उपस्थिती होती. सामाजिक सलोखा राखा, कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका,कुठल्याही समाजविघातक कृत्यात सहभागी होऊ नका,आपण सर्वप्रथम भारतीय आहोत याची जाण ठेवा,कायदा व सुव्यवस्था राखण्यास पोलिसांना सहकार्य करा,कोणत्याही जाती धर्माच्या भावना दुखावतील असे फोटो मजकूर सोशल मीडियावर पोस्ट करू नये अशी माहिती उपस्थितांना देऊन समाजात सामाजिक सलोखा राखण्यासाठी सहकार्य करा अशे आवाहन पोलीस विभागातर्फे करन्यात आले.













