• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
  • E-paper
Online News Portal
ADVERTISEMENT
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
Online News Portal
No Result
View All Result
Home Uncategorized

समाजाच्या विकासासाठी महिला सबलीकरणाची आवश्यकता – जलसंपदा मंत्री जयंत पाटील

Ashish Ghume by Ashish Ghume
March 8, 2022
in Uncategorized
Reading Time: 3 mins read
A A
0
समाजाच्या विकासासाठी महिला सबलीकरणाची आवश्यकता – जलसंपदा मंत्री जयंत पाटील
Spread the Information

मुंबई : समाज आणि देशाच्या विकासासाठी महिलांना सबळ करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी केले.

RelatedPosts

मूलमध्ये १८ ऑक्टोबरला ‘भाऊंचा गरबा महोत्सव’; अभिनेत्री प्रार्थना बेहरे, आमदार सुधीर मुनगंटीवार यांची विशेष उपस्थिती

सेवा संकल्प अभियानांतर्गत मूल येथे डायलिसिस केंद्राचे लोकार्पण

चंद्रपूरच्या हवाईसेवेसाठी आ. सुधीर मुनगंटीवार यांची दिल्लीत आग्रही मागणी; मोरवा विमानतळाबाबत केंद्रीय मंत्र्यांची सकारात्मक भूमिका

राज्य महिला आयोगाच्या वतीने आदिशक्ती प्रेरणा पुरस्काराचे वितरण करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या कार्यक्रमाला उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे, डॉ. इंदिरा हिंदुजा आदी उपस्थित होते.

जलसंपदा मंत्री श्री. पाटील यांनी सांगितले की, महिलांकडे कौशल्यपूर्ण काम करण्याची नैसर्गिक गुणवत्ता असते. त्यांना संधी दिली तर त्या अतिशय उल्लेखनीय काम करतात. समाज आणि देशाच्या विकासासाठी महिलांना विविध क्षेत्रात संधी दिली पाहिजे.

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री श्री. उदय सामंत यांनी राज्यातील महाविद्यालय आणि विद्यापीठ परिसर छेडछाडमुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले. मुलींना भयमुक्त वातावरणात शिक्षण घेता यावे यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

शालेय शिक्षण मंत्री श्रीमती वर्षा गायकवाड म्हणाल्या, महाराष्ट्रातील अनेक महिलांनी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. महिलांना सन्मानाची वागणूक मिळाली पाहिजे. महिलांनी आपल्या अंगभूत गुणवत्तेला विकसित केले पाहिजे.

सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या आरोग्य तपासणी मोहिमेची माहिती देणारी सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांचे मार्गदर्शन असलेला संदेश व्हिडिओ क्लिपद्वारे दाखविण्यात आला.

यावेळी पोलीस आयुक्त संजय पांडे, डॉ. इंदिरा हिंदुजा यांनीही मनोगत व्यक्त केले.

यावेळी लोहारा पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक दिपमला भेंडे, सहायक पोलीस निरीक्षक शुभांगी आगाशे, पोलीस कर्मचारी रेणुका सांगळे, प्रतिमा डेरे, श्रीमती रजनीगंधा गेडाम, संध्या दूरधवे, औरंगाबाद जिल्ह्यातील टपरगावच्या सरपंच रुपाली मोहिते, उपसरपंच वैशाली तुपे, सीमा भगवान, संध्या मोहिते, नाशिकच्या माधुरी आहेर, संगीता टेकाडे, नगरच्या ॲड. रंजना पवार-गवांदे, पोलीस उपायुक्त नियती ठाकर-दवे, सहायक पोलीस निरीक्षक सुरेखा धस, पुण्यातील सामाजिक कार्यकर्त्या दीक्षा दिंडे, मनिषा तोकले यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी प्रास्ताविक तर कार्यकारी अधिकारी दीपा ठाकूर यांनी आभार मानले.

Previous Post

महाराष्ट्रातील तीन महिला नारीशक्ती पुरस्काराने सन्मानित

Next Post

क्रीडा विज्ञान व क्रीडा व्यवस्थापनातील पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमास विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मान्यतेबाबतची अधिसूचना निर्गमित – क्रीडामंत्री सुनील केदार यांची माहिती

Ashish Ghume

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 87.1k Followers
  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

February 2, 2025
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

March 5, 2023
वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

January 5, 2024
सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

October 6, 2022
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

1
रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

1
‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

1
 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

1
भूसंपादनाविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार; आष्टीत ठिय्या आंदोलनाने महामार्ग ठप्प!

भूसंपादनाविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार; आष्टीत ठिय्या आंदोलनाने महामार्ग ठप्प!

November 3, 2026
मेडीगड्डा बॅरेजवर मुख्य सचिवांची नजर; सिरोंच्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर काय निघणार तोडगा?

मेडीगड्डा बॅरेजवर मुख्य सचिवांची नजर; सिरोंच्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर काय निघणार तोडगा?

November 1, 2026
अवाजवी वीज बिलांविरोधात उद्या आलापल्लीत विराट मोर्चा; आदिवासी विद्यार्थी एकता युवा मंचचा पुढाकार

अवाजवी वीज बिलांविरोधात उद्या आलापल्लीत विराट मोर्चा; आदिवासी विद्यार्थी एकता युवा मंचचा पुढाकार

November 1, 2026
लोहपुरुष सरदार पटेल यांच्या जयंतीनिमित्त अहेरीत सीआरपीएफची ‘रन फॉर युनिटी’; एकतेचा दिला संदेश!

लोहपुरुष सरदार पटेल यांच्या जयंतीनिमित्त अहेरीत सीआरपीएफची ‘रन फॉर युनिटी’; एकतेचा दिला संदेश!

November 1, 2026

Recent News

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
WhatsApp-Add-1