ज्ञानदीप ग्रंथालय व विद्यार्थी सेवा संघाच्या ‘पाणी अभियानाने’ वन्यजीवांना दिला जीवदान!
दौंड प्रतिनिधी – योगेश राऊत
पाटस : उन्हाच्या कडाक्याने वनक्षेत्र व माळरानावर वावरणाऱ्या वन्यजीवांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. काही वन्यप्राण्यांच्या जीवितास धोका निर्माण झाल्याने, ज्ञानदीप ग्रंथालय पाटस व विद्यार्थी सेवा संघाने “पाणी अभियान” राबवले.
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त हिंगणी गाडा, रोटी वनक्षेत्रातील ससे, हरीण, काळवीट, मोर आणि अन्य वन्यप्राणी तसेच पक्ष्यांसाठी सुमारे ६ हजार लिटर पाणी कृत्रिम पाणवठ्यांमध्ये सोडण्यात आले. यामुळे वन्यजीवांची तहान भागविण्यात मदत झाली.
- यापुढेही पाटस, रोटी, हिंगणी, कुसेगाव, सुपे परिसरातील वनक्षेत्रांमध्ये गरजेनुसार पाणी सोडण्यात येणार असल्याची माहिती ग्रंथालय व संघाच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.
या उपक्रमात ज्ञानदीप ग्रंथालयाचे हर्षद बंदीष्टी, प्रमोद ढमाले, गौतम पानसरे, राज मुलाणी, तसेच सामाजिक कार्यकर्ते विनोद कुरूमकर, विठ्ठल वाळुंजकर, राजू गोसावी, संतोष खरात आणि वन अधिकारी रामेश्वर तेलंगरे, बाबा कोकरे उपस्थित होते.
सामाजिक बांधिलकीतून महापुरुषांचे पुण्यस्मरण करण्याची ही काळाची गरज असल्याचेही उपस्थितांनी नमूद केले.













