फार्म हाऊस फोडून 26,500/- रुपयांचा ऐवज लंपास
शिरूर प्रतिनिधी – रमेश बनसोडे
शिरूर तालुक्यातील करडे गावच्या हद्दीत अज्ञात चोरट्यांनी फार्म हाऊस फोडून सुमारे 26,500/- रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी राहुल गौतम कदम यांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक 06/03/2025 रोजी संध्याकाळी 5:00 वाजेपासून ते 08/03/2025 रोजी सकाळी 9:00 वाजेच्या दरम्यान करडे गावातील बांदलमळा शिवारात असलेल्या त्यांच्या बहिणीच्या फार्म हाऊसचे कुलूप अज्ञात व्यक्तीने तोडले. घरात प्रवेश करून टीव्ही, साउंड बॉक्स, गॅस सिलेंडर, ड्रिल मशीन, मिक्सर, स्टीलच्या 30 ताटांसह इतर महत्त्वाच्या वस्तू चोरून नेल्या.
या चोरीची एकूण किंमत 26,500/- रुपये असून, या प्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात गु.र.नं. 158/2025 नुसार BNS कलम 331(3), 331(4), 305 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर प्रकरणाचा अधिक तपास HC/1252 भोते करीत आहेत.
पोलीस अधिक तपास करत असून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेज व स्थानिकांकडून माहिती घेतली जात आहे. नागरिकांनी संशयास्पद हालचाली आढळल्यास तत्काळ पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.













