बाभुळसर बुद्रुकचा सुपुत्र ओंकार गवळी यांचा डेन्मार्क (युरोप) दौरा
बाभुळसर बु प्रतिनिधी-अल्लाउद्दीनअलवी, शिरूर तालुक्यातील बाभुळसर बुद्रुक येथील ओंकार नवेशराव गवळी (ए.बी.एम., शेवटचे वर्ष) यांची युरोपमधील डेन्मार्क येथे इतिहॅडमध्ये १८ महिन्यांच्या इंटर्नशिपसाठी निवड झाली आहे. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल बाभुळसर बुद्रुक विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्यादित यांच्या वतीने संस्थेच्या कार्यालयात ओंकार गवळी यांचा शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात बाभुळसर बुद्रुक विविध कार्यकारी सेवा संस्थेचे चेअरमन भरत नारायण नागवडे आणि सरपंच महेंद्र नागवडे यांनी ओंकार गवळी यांचा सन्मान केला. याप्रसंगी व्हाईस चेअरमन रामदास शंकर नागवडे, माजी चेअरमन आणि विद्यमान संचालक विलास बापू नागवडे, नवेशराव गवळी (माजी अध्यक्ष, शाळा व्यवस्थापन समिती, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा), संचालिका मंदाकिनी नागवडे, माजी व्हाईस चेअरमन अंकुश आबा नागवडे, किशोर विलास नागवडे (चेअरमन, श्रीराम विकास सोसायटी), अल्लाउद्दीन अलवी (सचिव, राज्य मराठी पत्रकार परिषद, शिरूर तालुका), माजी सरपंच रामभाऊ माने, संचालक दशरथ राऊत, सोमनाथ नागवडे, राजेंद्र मचाले, राजेंद्र गवळी, संस्थेचे सचिव संजय बबन नागवडे, प्रज्वल गवळी, अविनाश थोरात आदी मान्यवर उपस्थित होते. अंकुश आबा नागवडे यांनी उपस्थितांच्या वतीने ओंकार गवळी यांना परदेशी दौऱ्यासाठी शुभेच्छा दिल्या. तसेच, बाभुळसर बुद्रुकच्या सुपुत्रांसाठी ओंकार एक नवा आदर्श ठरावा, प्रत्येकाने आई-वडिलांचे नाव मोठे करण्यासाठी आणि ओंकारप्रमाणे भविष्य घडवण्यासाठी प्रयत्न करावेत, तसेच स्वतःचे करिअर घडवण्याचा प्रयत्न करावा, असे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किशोर नागवडे यांनी केले, तर संस्थेचे सचिव संजय नागवडे यांनी उपस्थितांचे आभार मानले.