• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
  • E-paper
Online News Portal
ADVERTISEMENT
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
Online News Portal
No Result
View All Result
Home चंद्रपूर

कुरखेडा येथे शिवजन्मोत्सव सोहळा उत्साहात साजरा

Ashish Ghume by Ashish Ghume
February 21, 2025
in चंद्रपूर
Reading Time: 1 min read
A A
0
कुरखेडा येथे शिवजन्मोत्सव सोहळा उत्साहात साजरा
Spread the Information

कुरखेडा : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शिवभक्त परिवाराच्या वतीने कुरखेडा येथे तीन दिवसीय शिवजन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. विविध स्पर्धा, मिरवणुका, संगीत व सांस्कृतिक कार्यक्रमांनी संपूर्ण शहर शिवमय झाले होते.

तीन दिवसांचे विविध कार्यक्रम

१८ फेब्रुवारी
पहिल्या दिवशी बालगोपालांसाठी वेशभूषा आणि नृत्य स्पर्धा आयोजित करण्यात आली. या स्पर्धेत लहानग्यांनी शिवकालीन योद्धे, राजमाता जिजाऊ, मावळे, संत, वीरांगना यांच्या वेशभूषांमध्ये सहभाग घेतला. स्पर्धेतील प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक विजेत्यांना सन्मानचिन्ह व पारितोषिक देण्यात आले, तसेच सहभागी प्रत्येक स्पर्धकाला प्रोत्साहनपर बक्षीस देण्यात आले.

RelatedPosts

वाईट गोष्टींना नाही म्हणायला शिका; स्वतःचे संरक्षण करण्याची सवय लावा — ओमप्रकाश सोनटक्के

स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला चिमुकल्यांना शैक्षणिक किटचे वाटप

वी दा सावरकरांच्या जीवनपैलूंवर शरद पोंक्षे यांचे व्याख्यान

१९ फेब्रुवारी
दुसऱ्या दिवशी सकाळपासून शाहिरी पोवाडे आणि शिवभक्तीपर गीतांच्या गजराने शहर शिवमय झाले. रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते, ज्यात अनेक स्पर्धकांनी भाग घेतला. सकाळी ९ वाजता भगव्या ध्वजाचे ध्वजारोहण व ध्वजवंदना झाली. यानंतर दिंडी व पालखी सोहळ्याची सुरुवात झाली. दुपारी छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक आरती व पाळणा सोहळा संपन्न झाला. सायंकाळी भव्य मिरवणूक व झांकी प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. मिरवणुकीत शिवाजी महाराज आणि अफझल खान भेटीचा देखावा विविध चौकांमध्ये सादर करण्यात आला.

२० फेब्रुवारी
तिसऱ्या दिवशी स्पर्धांचे बक्षीस वितरण करण्यात आले. सायंकाळी युवांगण म्युझिकल ग्रुप तर्फे शिवमय गीतांचा कार्यक्रम झाला. संपूर्ण कार्यक्रमानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.

या सोहळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी शिवभक्त परिवाराच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. नागरिकांनीही मोठ्या संख्येने सहभाग घेऊन शिवजन्मोत्सव सोहळ्याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

Previous Post

गुलाब पुष्प देत दहावीच्या विद्यार्थ्यांचे स्वागत

Next Post

भरदिवसा घराला लागली आग,नागरिकांनी धाव घेतली मात्र काही क्षणात होत्याचं नव्हतं झालं

Ashish Ghume

Ashish Ghume

Next Post
भरदिवसा घराला लागली आग,नागरिकांनी धाव घेतली मात्र काही क्षणात होत्याचं नव्हतं झालं

भरदिवसा घराला लागली आग,नागरिकांनी धाव घेतली मात्र काही क्षणात होत्याचं नव्हतं झालं

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 87.1k Followers
  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

February 2, 2025
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

March 5, 2023
वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

January 5, 2024
सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

October 6, 2022
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

1
रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

1
‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

1
 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

1
२३ ते २८ सप्टेंबरदरम्यान जिल्हाभर पर्यटन महोत्सव; ट्रेकिंग, नेचर वॉक, नाईट कॅम्पिंगसह विविध उपक्रम

२३ ते २८ सप्टेंबरदरम्यान जिल्हाभर पर्यटन महोत्सव; ट्रेकिंग, नेचर वॉक, नाईट कॅम्पिंगसह विविध उपक्रम

September 15, 2026
लसीकरणानंतर बाळाच्या मृत्यूची सखोल चौकशी करा शिवसेना ठाकरे गटाची मागणी; कुटुंबीयांची घेतली भेट

लसीकरणानंतर बाळाच्या मृत्यूची सखोल चौकशी करा शिवसेना ठाकरे गटाची मागणी; कुटुंबीयांची घेतली भेट

September 15, 2026
माजी माओवादी ‘भूपती’च्या नियुक्तीला ग्रामसभेचा विरोध; आदिवासी हक्कांच्या संवेदनशील कामाची जबाबदारी देण्यावर आक्षेप!

माजी माओवादी ‘भूपती’च्या नियुक्तीला ग्रामसभेचा विरोध; आदिवासी हक्कांच्या संवेदनशील कामाची जबाबदारी देण्यावर आक्षेप!

September 7, 2026
होंडा सिटीच्या डिक्कीत देशी दारूचा साठा; ७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

होंडा सिटीच्या डिक्कीत देशी दारूचा साठा; ७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

September 7, 2026

Recent News

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
WhatsApp-Add-1