अहेरी:-तालुक्यातील कमलापूर गावात महेश गादासवार यांच्या घराला अचानक आग लागली.या आगीत घरात ठेवलेल्या पेट्रोलने पेट घेतल्याने दोन दुचाकीसह,घर जळून खाक झाल्याची दुर्दैवी घटना घडली.ही घटना आज सकाळी १० वाजताच्या सुमारास घडली.

प्राप्त माहितीनुसार आज सकाळी दहा वाजताच्या सुमारास महेश गादासवार यांच्या घराला अचानक आग लागली.घरात पेट्रोल साठवून ठेवल्याने आगीने क्षणातच रौद्ररूप धारण केले.पाहता पाहता अंगणात उभी असलेली दोन दुचाकी वाहने आणि समोरील दोन रूम जळून खाक झाली.आगीचा रौद्ररूप पाहून घरातील सर्व मंडळी बाहेर पडली. घराला आग लागल्याचे दिसल्यावर परिसरातील नागरिकांनी धाव घेत मिळेल त्या भांड्यामध्ये पाणी आणून आग विझविण्याचा प्रयत्न केला.मात्र,तोपर्यंत त्यांचा मोठं नुकसान झाला.
नेमकं आग कशामुळे लागली हे कळू शकले नाही.मात्र,घरात कॅन मध्ये पेट्रोल साठवून असल्याने त्याचा भडका उडाला आणि आगीने रौद्ररूप धारण केले.आग विझविण्यासाठी नागरिकांनी त्वरित धाव घेतल्याने मोठा अनर्थ टळला.अन्यतः आजूबाजूला लागून असलेली घरे देखील जळून खाक झाली असती.
सुदैवाने सिलेंडरचा स्फोट नाही

पेट्रोल आणि गॅस सिलेंडर साठवून असल्याने लागलेल्या आगीमुळे पेट्रोलचा भडका उडाला.मात्र,एकही गॅस सिलेंडरचा स्फोट झाला नाही.भरलेले काही गॅस सिलेंडर अंगणात होते.जर गॅस सिलेंडरचा स्फोट झाला असता तर मोठी घटना घडली असती.













