देवळी, ४ फेब्रुवारी: देवळीत मंगळवारी सकाळी सव्वा
दहाच्या सुमारास एका तरुणाने आपल्या पित्याची हत्या
केल्याची खळबळजनक घटना घडली. आईला
वाचवण्यासाठी मुलाने हा टोकाचा निर्णय घेतल्याचे
समोर आले आहे.
फुकटनगर येथे किरणनाथ मंदिराच्या पाठीमागील
गल्लीतील रहिवासी नारायण कुराडे (५८) हे पत्नी आणि
अविवाहित मुलगा अशोक कुराडे (२७) यांच्यासोबत
राहत होते. नारायण कुराडे यांचा पत्नीवर नेहमीच
अत्याचार होत असे. यामुळे मुलगा अशोकने वडिलांना
अनेक वेळा समजावण्याचा प्रयत्न केला होता
घटनेच्या दिवशी अशोक कामावर असताना त्याला
आईवर वडिलांकडून पुन्हा बेदम मारहाण सुरू
असल्याची माहिती मिळाली. तातडीने घर गाठून
अशोकने कोणालाही न जुमानता वडिलांच्या डोक्यावर
लाकडी दांड्याने जोरदार प्रहार केला. या गंभीर प्रहारात
नारायण कुराडे यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
घटनेनंतर अशोक कुराडेने घटनास्थळावरून पळ
काढला या प्रकरणाचा तपास देवळीचे ठाणेदार आर.
एम. शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अश्विन
गजभिये, कुणाल हिवसे व धमेंद्र गिरी करीत आहेत.
ही घटना देवळीत खळबळ माजवणारी ठरली असून
समाजात कुटुंबीयांमधील नातेसंबंधांवर प्रश्नचिन्ह
उपस्थित केले जात आहे.













