
पारनेर तालुक्यातील खडकवाडी येथील रोकडे वस्तीवरील जिल्हा परिषद शाळेतील इयत्ता चौथीत शिकणारी ईश्वरी पांडुरंग रोहकले हिचा बिबट्याने केलेल्या हल्ल्यात मृत्यू झाला. गुरुवारी सायंकाळी सात ते सव्वासातच्या दरम्यान रोहकले यांच्या राहत्या घरी ही दुर्दैवी घटना घडली.
या परिसरात दररोज बिबट्याचा वावर होताना दिसत असल्यामुळे परिसरातील नागरिक भयभीत झालेले आहेत. वन विभागाने याची त्वरित दखल घेऊन अजून वाट न पाहता, ठिकठिकाणी ताबडतोब पिंजरा लाऊन बंदोबस्त करावा. ग्रामीण भागामध्ये शेती पंपांना रात्रीची वीज मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांना शेतीला रात्रीचे पाणी देने जिक्रीचे झाले आहे. वन विभागाने वेळ न दवडता ताबडतोब बिबट्यांचा बंदोबस्त करावा, अशा मागणीचे पत्र भूमिपुत्र संघटनेच्या वतीने वन विभागाला देण्यात आले आहे.
या मागणीची तत्काळ दखल घ्यावी, अन्यथा भूमिपुत्र संघटनेचे अध्यक्ष संतोष वाडेकर यांच्या नेतृत्वाखाली तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा राजेंद्र रोकडे यांनी दिला आहे.












