
शिरूर (मांडवगण फराटा ) येथे मांडवगण फराटा ग्रामपंचायत व एच व्ही. देसाई नेत्र रुग्णालय याच्या मार्फत मोफत नेत्र तपासणी व उपचार यांचे शिबिराचे आयोजन आपल्या मांडवगण फराटा मधील आयुष्यमान आरोग्य मंदिरात भरवले होते.( प्राथमिक आरोग्य केंद्र) ता.शिरूर.जिल्हा.पुणे.
याच्या अंतर्गत एच. व्ही.देसाई नेत्र रुग्णालय महमदवाडी पुणे यांच्या मार्फत एकूण २१३ व्यक्तीची डोळ्यांची तपासणी करण्यात आली.या नेत्र तपासणी शिबिरात जवळ जवळ आठ गावातील नेत्र रुग्णाने भाग घेतला होता असे कळले.एकूण २१३ व्यक्तीची तपासणी करण्यात आली त्यामध्ये २२ व्यक्तींना मोती बिंदू झाल्याचे आढळले असून पुढे त्याच्यावर एच. व्ही. देसाई येथे मोफत शस्त्रक्रिया या सर्व आढळलेल्या रुग्णांवर होणार आहे.या नेत्र तपासणी शिबिराचे उद्घाटन सरपंच समीक्षा फराटे.उपसरपंच पांडुरंग मोरे.तसेच आयुष्यमान आरोग्य मंदिराचे वैद्यकीय अधिकारी नितीन फाटले.आरोग्य साहय्यक सांगळे.करपे.LSO कटाळे.फार्मसिस्ट माने. सिस्टर ज्योती बनसोडे (गुजे).परिचर बनसुडे.ऋषिकेश मोरे.रेश्मा घोडके.अभिजित थोरात. असे मान्यवर उपस्थित होते.












