मूल (प्रतिनिधी):चंद्रपूर-गडचिरोली महामंडळाच्या एम एच 40 एन 8525 क्रमांकाच्या बसने प्रवास करत असताना दरवाजा निघाल्याने दोन विद्यार्थी बसमधून खाली पडून गंभीर जखमी झाल्याची घटना 5 सप्टेंबर रोजी गुरुवारी सकाळी 10:30 वाजता डोनी फाट्याजवळ घडली.
जखमी विद्यार्थ्यांमध्ये जोस्वा निकोडे (वय 14 वर्ष, राहणार आगडी), जो नवभारत विद्यालय, मुल येथे शिकतो, तसेच श्वेता गंगाधर सोयाम (वय 18 वर्ष, राहणार जाणाळा) या विद्यार्थिनीचा समावेश आहे.
प्राथमिक माहितीनुसार, बसच्या दरवाजाचा लॉक निघाल्यामुळे दोन्ही विद्यार्थी दरवाजातून बाहेर पडले व गंभीर जखमी झाले. घटना घडताच बसचे वाहक आणि चालक यांनी तत्काळ दोन्ही विद्यार्थ्यांना मूल उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर असल्यामुळे प्राथमिक उपचारांनंतर त्यांना पुढील उपचारासाठी चंद्रपूर येथील जिल्हा रुग्णालयात रेफर करण्यात आले आहे.