गोंडपिपरी – सूरज माडूरवार
गोंडपिपरी पोलिसांनी स्वातंत्र दिनाचे औचित्य साधत दि.(१५) गुरुवारी आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराला उदंड प्रतिसाद मिळाला.
रक्ताचा थेंब मूल्यवान आहे याची सर्वांना जान असावी या उदात्त हेतूने स्वातंत्र दिनाचे औचित्य साधत ठाणेदार हत्तीगोटे यांच्या मार्गदर्शनात गोंडपिपरी पोलीस स्टेशन येथे सकाळी १० वाजता पासून सायंकाळी ४ वाजेपर्यंत भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.
तालुक्यातील अनेक गावातून युवक,पोलीस पाटील,सामाजिक कार्यकर्ते,पोलीस कर्मचारी,विविध क्षेत्रातील महिला,राजकीय मंडळी, होम गार्ड,व्यापाऱ्यांसह विविध क्षेत्रातील १५१ नागरिकांनी रक्तदान शिबिरात भाग घेत रक्तदान सर्वश्रेष्ठदान असा सामाजिक संदेश दिला.ठाणेदार रमेश हत्तीगोटे यांच्या संकल्पनेतून हे शिबिर आयोजित करण्यात आले होते.रक्तदान शिबिराच्या यशस्वीतेसाठी पीएसआय मंगेश कराडे,मनोहर मते,सुशील गोंगले,तिरुपती गोडसेलवार यांच्यासह अनेक पोलीस कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले.ठाणेदार यांच्यासह तालुक्याचे तहसीलदार शुभम बहाकर यांनीही रक्तदान करून सामाजिक कर्तव्य पार पाडले.