वर्धा ( प्रशांत अवचट ) :– भाजपा नेते दत्ता मेघे यांचे पुतणे व येथील मेघे विद्यापीठाचे मुख्य कारभारी डॉ. अभ्युदय मेघे यांनी आज ०८ ऑगस्टला भाजपाला सोडचिठ्ठी देत काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. हा भाजपापेक्षा मेघे कुटुंबास मोठा धक्का समजल्या जात आहे.
अभ्युदय मेघे हे भाजप नेते तथा माजी खासदार दत्ता मेघे यांचे पुतणे आहेत. मुंबई येथे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या हस्ते अभ्युदय यांचा काँग्रेसमध्ये कार्यक्रम पार पडला. वर्धा विधानसभा उमेदवारीकरिता अर्ज सादर केल्याची माहिती मिळत आहे. विविध सामाजिक कार्यक्रमाच्या माध्यमातुन अभ्युदय मेघे यांचा जिल्ह्यात चांगला जनसंपर्क आहे. अभ्युदय मेघे वर्धा सोशल फोरमचे अध्यक्ष देखील आहेत. अभ्युदय मेघे यांच्या प्रवेशानंतर काँग्रेसमध्ये अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. सविस्तर वृत्त उद्याच्या अंकात